सदर कार्यक्रमाची सुरुवात पहिल्या दिवशी रासेयो उद्बोधन वर्गाने करण्यात आली. यामधे 'स्वच्छता हि सेवा' या उपक्रमाविषयी ची माहिती कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. पाटील यांनी दिली. तसेच प्रमुख वक्ते महाविद्यालयातील प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी राष्ट्रसंत गाडगे महाराज व महात्मा गांधी यांची महती सांगून मार्गदर्शन केले. त्यांनतर महाविद्यालय परिसर,तसेच मंदिर परिसर येथे रासेयो स्वयंसेवक, विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी या सर्वांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले. [ads id="ads2"]
उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी दत्तक वस्ती बलवाडी येथे रासेयो स्वयंसेवकांनी दोन तास श्रमदान केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. पाटील, सहा. कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. पी. पाटील व डॉ. एस. बी. पाटील यांनी परिश्रम घेतले.