रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील कोळदा या गावी दि.3. मंगळवार रोजी सायं 6 वाजता वंचित बहुजन आघाडी या पक्षाची बैठक गावातील ज्येष्ठ नागरिक भागवत भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे रफिक बेग यांनी मार्गदर्शन केले.[ads id="ads1"]
वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी या बैठकीला मार्गदर्शन करत असताना ते म्हणाले की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष कोण्या साध्यासुध्या माणसाचा पक्ष नसून हा पक्ष बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाचा पक्ष आहे आणि हा बौद्धा चा पक्ष नसून संपूर्ण वंचित समाजाच्या *एससी*, *एसटी* ,*ओबीसी* सर्व समावेशक जातींच्या लोकांचा पक्ष आहे म्हणून आपण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशाचे पालन केले पाहिजे. कारण येणाऱ्या काळामध्ये सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने स्वबळावर लढविणार आहे.[ads id="ads2"]
म्हणून आपण वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा प्रचार आणि प्रसार आतापासून सुरू केला पाहिजे म्हणून आपल्या गावामध्ये आम्ही येऊन आपल्याला वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे ध्येय धोरण रूपरेषा सांगत आहेत याचे कारण असे आहे की या देशातला काँग्रेस पक्ष याला बौद्ध समाजाचे मतदान चालते परंतु बौद्ध समाजाचा उमेदवार चालत नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांनाही निवडणुकी मध्ये पाडले होते आणि आजही काँग्रेस पक्ष श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश जी आंबेडकर यांना सोबत घेण्यास तयार होत नाही आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
सर्वांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे सभासद नोंदणी करून घ्यावी. असे वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे हे म्हणाले. या बैठकीला कंदर सिंग बारेला, अरविंद गाढे, प्रकाश भालेराव सुधीर चव्हाण सुरेश भालेराव गुलाब भालेराव विजय भालेराव निलेश ठाकरे प्रवीण कोळी राहुल भालेराव स्वप्निल इंगळे बहुसंख्या महिला पुरुष या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन संजय भालेराव आणि आभार राहुल भालेराव यांनी मानले .