यावल ( प्रतिनिधी ) फिरोज तडवी : यावल तालुक्यातील दहिगाव येथे राहणारा एक १२ वर्ष वयाचा मुलगा अचानक घरातून निघुन गेल्याने त्यांच्या कुटुंबाने त्यास कुणीतरी अज्ञात व्याक्ती फुसलावुन पळवुन नेल्याची तक्रार दाखल केली होती पोलीसानी या घटनेची दखल घेत त्या घर सोड्डन गेलेल्या तरुणाचा शोध लावण्यात यश मिळवले आहे . [ads id="ads1"]
या संदर्भात यावल तालुक्यातील दहिगाव येथील राहणारे शशीकांत शिवाजी महाजन वय४२वर्ष यांचा १२ वर्ष वयाचा डेविड नांवाचा मुलगा दिनांक ३० सप्टेंबर रोजी कुणास काही एक न सांगता घरातून निघुन गेला कुटुंबीयांनी सर्वत्र नातेवाईक व इतरत्र शोध घेतला असता तो मिळुन न आल्याने अखेर हरवलेल्या मुलाच्या वडिलांनी दिनांक १ ऑक्टोबर रोजी यावल पोलिस ठाण्यात कुणीतरी अज्ञात व्यक्ती आपल्या मुलास फुसलावुन पळवुन नेल्याची तक्रार दाखल केली होती. [ads id="ads2"]
मुलगा देविड याचे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावुन पळवुन नेल्याची तक्रार दिनांक १ ऑक्टोबर रोजी मुलाच्या वडिलानी दाखल केली होती या अनुषंगाने यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, पोलीस नाईक राजेन्द्र पवार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवुन फिर्याद दाखल झाल्याच्या अवघ्या दोन तासातच भुसावळच्या रेल्वे स्थानकावरच्या प्लेट फार्म क्रमांक तिनवर शोध घेत असता सदरील मुलगा सिसिटीव्हीच्या मदतीने देविड हा भुसावळ रेल्वे स्थानकाच्या टीकीट खिडकी जवळ मिळवुन आला , हरवलेल्या मुलास सुखरूप पोलिसानी त्यास वडील शशीकांत महाजन यांच्या स्वाधीन केले .. केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी राज्यातील चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने घेतलेल्या 'ऑपरेशन मुस्कान'च्या विशेष मोहिमांमध्ये अनेक मुलामुलींची त्यांच्या पालकांशी भेट झाली. त्यामुळे अशा मोहिमांच्या माध्यमातून हरवलेल्या मुलांची वाट पाहत दाराकडे डोळे लावून बसलेल्या कित्येक पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आहेत.
हरविलेल्या मुलांची त्यांच्या पालकांशी भेट घडवून देण्याचे काम पोलिसांसाठी आव्हानात्मक असते. त्यासाठीच विशेष पथकाची मोहीम आखली जाते कानाकोपऱ्यातून मुलांमुलींची सुटका करून आणण्यात यश मिळवले. त्यामुळें नागरिकांमधू पोलिस प्रशासनाने मोठे कौतुक करण्यात आले,