जळगाव (राहुल डी गाढे) - केंद्र शासनाच्या 'स्टँड अप इंडिया' योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र नवउद्योजक तरूणांना मार्जीन मनी उपलब्ध करून देणेबाबतची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचा समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.[ads id="ads1"]
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र १८ वर्षा वरील नवउद्योजक तरूणांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास 'स्टॅंड अप इंडिया' योजनेअंतर्गत ७५% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या १५% हिस्सा (अनुदान) राज्य शासनामार्फत देण्यात येईल.[ads id="ads2"]
जळगाव जिल्हयातील पात्र इच्छूक नवउद्योजक तरूणांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगाव या कार्यालयाशी संपर्क साधावा व सदर योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहनही श्री योगेश पाटील यांनी केले आहे.