भुसावळ ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व च्या श्रामनेर झालेल्या उपासकांसाठी केंद्राच्या आदेशाप्रमाणे बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा आज चाळीस बंगला बुद्ध विहार, भुसावळ येथे घेण्यात आली. मुख्य परीक्षक म्हणून राष्ट्रीय सचिव आदरणीय वसंत पराड गुरुजी होते. उप मुख्य परीक्षक म्हणून ए टी सुरडकर गुरुजी होते. [ads id="ads1"]
तसेच परीक्षक१ आदरणीय लताताई तायडे आणि परीक्षक२ आदरणीय युवराज नरवाडे गुरुजी होते. सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून आणि सामूहिक त्रिसरण पंचशील घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. [ads id="ads2"]
त्यानंतर आदरणीय वसंत पराड गुरुजी यांनी परीक्षेविषयी सविस्तर माहिती दिली. यानंतर सुरुवातीला परीक्षा लेखी स्वरूपात घेण्यात येऊन नंतर तोंडी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला एकूण 16 परीक्षार्थी बसलेले होते. कार्यक्रमाला जिल्ह्यातून जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, ८ तालुक्यातील कार्यकारिणीतील पदाधिकारी, तसेच केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धाचार्य उपासक- उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय रविंद्र वानखेडे होते, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस आनंद ढिवरे यांनी केले.