रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्याची महत्वपूर्ण बैठक रावेर येथील नवीन विश्रामगृह( रेस्ट हाऊस) येथे वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीला खास करून वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जिल्हा पूर्वचे निरीक्षक व महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष मा.शरद दादा वसतकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदनाताई सोनवणे, जिल्हा सरचिटणीस वंदनाताई आराक, उपाध्यक्ष मीराताई वानखेडे हे उपस्थित होते.[ads id="ads1"]
वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी थोडक्यात रावेर तालुक्याचा आढावा सांगून जास्तीत जास्त संख्येने मुंबई येथील जाहीर सभेत जाणार असल्याचे सांगितले. तसेच महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष यांनी सुद्धा महिलांना व कार्यकर्त्यांना बहुसंख्येने मुंबई येथील संविधान सभेत रावेर तालुक्यातील बहुसंख्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जिल्हा निरीक्षक मा. शरद दादा वसतकर हे म्हणाले की श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांनी दि. 25 नोव्हेंबरला संविधान सन्मान सभा आयोजित केली आहे. [ads id="ads2"]
त्याचे कारण असे आहे की इथला तमाम एससी, एसटी, ओबीसी या संपूर्ण जातीच्या लोकांसाठी जे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आहे आणि या भारत देशाला दिले आहे ते इथल्या वंचित समूहाचे भलं झालं पाहिजे आणि इथला वंचित समूह हा सत्तेत बसला पाहिजे यासाठी संविधान जागरण सभा झाली पाहिजे. म्हणून संविधान हे फार महत्त्वाचे आहे. म्हणून इथल्या तमाम एससी एसटी ओबीसी समाजाने जास्तीत जास्त संख्येने मुंबई येथील संविधान सन्मान महा रॅलीमध्ये मध्ये व सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचे आहे ही सभा शिवाजी पार्क दादर मुंबई येथे आयोजित केली आहे.असे जळगाव जिल्हा पूर्वचे निरीक्षक मा. शरद दादा वसतकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा संघटक शेख याकूब शेख नजीर, विश्वनाथ मोरे, ज्ञानेश्वर तायडे, सुरेश अटकळे,अर्जुन वाघ, कैलास तायडे, विजय भालेराव ,राजेंद्र अवसरमल, अजय तायडे ,शंकर लहासे, कंदरसिंग बारेला ,दौलत अढांगळे ,सुरेश बारेला ,वैभव संन्यासी, दीपक कोंघे ,प्रवीण बारेला, विकास बारेला, ललिता कोचुरे ,सायरा कोचुरे या बैठकीचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे तालुका सरचिटणीस कांतीलाल गाढे यांनी केले आणि आभार अरविंद गाढे यांनी मानले.


