ऐनपूर खून प्रकरणी एकास अटक : चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची दिली कबुली : स्थानिक गुन्हे शाखा व निंभोरा पोलिसांना गुन्ह्याची उकल करण्यात यश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर तालुका प्रतिनिधी  -विनोद हरी कोळी

 ऐनपुर ता.रावेर येथील युवक शेख अफजल शेख असलम याचा दि १४रोजी ऐनपुर शिवारात गायरान परिसरात खून करण्यात आला होता.या खुनाबाबत तांत्रिक माहिती गोळा करीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, व निंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश धुमाळ यांनी याप्रकरणी  संशयाची सुई असलेला संशयित ऐनपुर गाव सोडून पत्नीसह निघून गेलं असल्याचे समजले.व त्याच्या तपासासाठी दोन वेगवेगळी पथके तयार करून मध्यप्रदेशात पाठविण्यात आली.[ads id="ads1"]

  मध्यप्रदेशातील माफियापाडा पोस्ट धुलकोट ता नेपानागर येथे आदिवासी पोशाखात पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी अर्जुन नरसिंग भिल (वय ४०) यास दुपारी अटक केली. यावेळी त्याने सदर तरुणाचे पत्नीशी संबंध असल्याच्या चारित्र्याच्या संशयावरून बांबू डोक्यात मारून खून केल्याची कबुली दिली.[ads id="ads2"]

त्या अनुषंगाने अर्जुन नरसिंग भील याच्यावर निंभोरा पोलिसात भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली. पुढील तपास सपोनि गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय काशिनाथ कोळंबे राका पाटील करीत आहेत.

तपास पथकामध्ये यांचा होता सहभाग

सपोनि गणेश धुमाळ, पीएसआय राका पाटील पीएसआय काशिनाथ कोळंबे, ईश्वर चव्हाण,ज्ञानेश्वर चौधरी, रिजवान पिंजारी, किरण जाधव, स्वप्निल पाटील यांचा समावेश होता .

तर स्थानिक गुन्हे शाखेतर्फे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील,पीएसआय  गणेश वाघमारे,विजयसिंह पाटील,कमलाकर बागुल,महेश महाजन,दीपक पाटील,नितीन बाविस्कर संदीप साकळे आदींचा सहभाग होता.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!