अज्ञात इसमांकडून एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या ; रावेर तालुक्यातील निंबोल-ऐनपुर गायरान परिसरातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद हरी कोळी)

         रावेर तालुक्यातील निंबोल ऐनपूर गायरान परिसरात अज्ञात इसमाने एका तरुणाचा मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या ठिकाणी निंभोरा पोलीस स्टेशनचे पीएसआय(PSI) व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास शोध चालू आहे.[ads id="ads1"]

       शेख अफजल शेख असलम( उर्फ कालू) वय 30 राहणार ऐनपुर तालुका रावेर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह शेतमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. आज मंगळवार रोजी संध्याकाळी गायराना ला लागून आपल्या शेतात गेला असता त्या ठिकाणी त्याचे अज्ञात व्यक्तींसोबत वाद झाल्याचे बाबा समोर येत आहेत. त्यातूनच हा खून झाला आहे. [ads id="ads2"]

 प्रथमदर्शनी दगडाने डोकं ठेचून खून झाल्याचे दिसून येत आहेत. घटनास्थळी खूप मोठी गर्दी झाल्याची दिसून येत आहेत. त्या ठिकाणी जळगावची श्वान पथक टीम बोलावून शोध मोहीम करण्यात आली तसेच निंभोरा पोलीस स्टेशनचे पीएसआय धुमाळ  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी  यांचे शोध मोहीम सुरू आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!