सावदा ता.रावेर वार्ताहर (युसूफ शाह)
सावदा :- कोणीही सट्टा शौकीन सट्टा मटका खेळून कमी जास्त पैसे हरू नये किंवा लावू नये म्हणून की काय?दिवाळी सणानिमित्त कल्याण/वर्ली हा सुप्रसिद्ध सट्टा मटका १० दिवसांकरिता बंद असल्याने या संधीचा सोना करण्यासाठी एका बाहेरील सट्टा किंग कडून थेट सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत यंत्रणेच्या नाकाखाली स्वयंघोषित गुजरात डे नावाचा डब्बा मटका जोमात सुरू करण्यात आलेला आहे.[ads id="ads1"]
याबाबत अधिक माहिती अशी की,कल्याण वरली हा सट्टा मटका दिवाळी सणानिमित्त दहा दिवस बंद राहील यादरम्यान एका बाहेरील सट्टा किंग मेकर यांनी नामी शक्कल लढवून गुजरात डे नावाचा एक स्वयंघोषित बोगस डब्बा मटका रावेर तालुक्यासह सावदा येथे प्रत्येक गल्लीबोळात,उघडपणे पाट्या लावून त्याचे एजंटद्वारे घेत असून, १,२,३,४,५,६,७,८,९,० पैकी जे आकडा कमी खेळला जातो तोच आकडा घोषित केला जावून सट्टा शौकिनाची आर्थिक फसवणूक करून या बोगस डब्बा मटक्याद्वारे बाहेरील सट्टा किंग दररोज मोठी आर्थिक कमाई करीत असून,यात पैसे हरल्यामुळे बरेच गोरगरीबांची दिवाळी अंधारमय झाल्याची चर्चा देखील शहरात रंगलेली आहे.सदरील डब्बा मटक्याचा ओपन आकडा दुपारी ३-१५ वाजता तर क्लोजचा आकडा संध्याकाळी ५-१५ वाजता घोषित केला जातो.[ads id="ads2"]
तसेच हा सट्टा किंग नशिराबाद येथील असल्याचे बोलले जात आहे.तरी शहरात सुरु असलेल्या बोगस डब्बा मटका पासून स्थानिक पोलीस यंत्रणा अनभिज्ञ तर नाही ना?तसेच शहरात हा प्रकार सुरू आहे किंवा नाही याबाबत वार्ताहर या नात्याने,गुप्तपणे चौकशी केली असता एका सट्टा घेणाऱ्या एजंट यांनी सांगितले की,आमच्या मालकास हप्ते द्यावे लागते, म्हणून हा गुजरात डे नावाचा डब्बा मटका दहा दिवसांकरिता आमच्या मालकांनी सुरू केलेला आहे.तरी संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा सूज्ञ नागरिकाकडून व्यक्त केले जात आहे.