मुख्याध्यापिका सौ हर्षाली बेंडाळे यांना काॅग्रेस शिक्षक सेल अकोला यांच्या कडून राज्यस्तरीय पुरस्कार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 विवरे  (संजय मानकरे) : रावेर तालुक्यातील विवरे येथील श्री.ग.गो. बेंडाळे प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ हर्षाली बेंडाळे मॅडम यांना दि.5 नोव्हेंबर 2023 रोजी, स्वराज्य भवन अकोला येथे, काॅग्रेस शिक्षक सेल महाराष्ट्र राज्य,शाखा अकोला जिल्हा कडून घेण्यात आलेल्या, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात सौ हर्षाली बेंडाळे मॅडम यांना पुरस्कार प्रदान केला.[ads id="ads1"]

  पुरस्कार स्वीकारताना प्रियंका सुरळकर, छाया सोनवणे ह्या होत्या, पदवीधर मतदार संघ अमरावती विभागाचे आमदार धीरज भाऊ लिंगाडे, अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक, काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रकाश  सोनवणे, प्रकाश भाऊ तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तसेच माजी विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण तसेच काँग्रेस शिक्षक सेलचे सर्व अधिकारी व पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.[ads id="ads2"]

  तसेच शिक्षक विकास मंडळ संचलित चे  चेअरमन धनजी दादा  लढे, अध्यक्ष मार्तंड भिरुड, उपाध्यक्ष रामचंद्र देशमुख, सचिव प्राध्यापक शैलेश राणे सर, किरण पाचपांडे ,केशव राणे ,दिलीप राणे ,वसंत राणे ,रविद्र भिरुड, गोपाळ राणे, मनोहर राणे, विद्याताई राणे व श्री ग .गो बेंडाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक पी एच वायकोळे परिवेक्षक  आर टी कोल्हे सर यांनी अभिनंदन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!