![]() |
महिलेला शेळी देताना गौराम बिडवे. शेजारी रमाकांत डेरे, मनोज गाढे, मुख्याध्यापक ए. आर. चौधरी, योगेश्वर कोळी, अकिल शेख, भागवत कोळी, दत्तात्रय तायडे आदी |
तांदलवाडी ता. रावेर (प्रशांत गाढे) : येथे महाएकता फाउंडेशनतर्फे गावातील गरीब गरजू विधवा महिलांना उपजीविकेसाठी शेळी वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला. यात सरला घेटे, शीतल भोई, भारती कोळी, मुमताजबी शेख या गरजू महिलांना मदत मिळाली. [ads id="ads1"]
महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार विजेते डॉ. गौराम बिडवे (राजूर-नगर) अध्यक्षस्थानी होते. गरीब आणि विधवा महिलांना स्वतःच्या पायावर उभ्या करण्यासाठी आणि उद्योग व्यवसायासाठी चालना मिळावी म्हणून शेळी भेट दिल्याचे त्यांनी कौतुक केले. [ads id="ads2"]
महाएकता फाउंडेशनने कार्यक्रम यशस्वी करुन दाखवीत हिंदू-मुस्लीम एकतेचेही प्रतीक दिसून आल्याचे श्री. बिडवे म्हणाले. रमाकांत डेरे, पुणे (खेड) येथील राष्ट्रपती आदर्श सरपंच पुरस्कार विजेते मनोज गाढे, अभिजित केदारे, मोहसीम शेख, शेखर पाटील, प्रमोद चौधरी, सुमित पाटील, मुख्याध्यापक ए. आर. चौधरी, दत्तात्र्यय उन्हाळे, पंडीत चौधरी, दत्तू चौधरी, महाएकता फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश्वर कोळी, उपाध्यक्ष अकिलभाई शेख, सचिव भागवत कोळी आदी उपस्थित होते. राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे अध्यक्ष दत्तात्र्यय तायडे यांनी सूत्रसंचालन केले.
हेही वाचा:- दिवाळीच्या सुट्टी असल्याने राजस्थानमध्ये फिरायला गेलेल्या कार अपघातात जळगाव जिल्ह्यातील 6 जणांचा मृत्यू