अध्यात्म शिरोमणी श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे आज दि.१८ रोजी यावल तालुक्यात आगमन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल ( सुरेश पाटील ) श्री क्षेत्र वेरुळ ता.रत्नपुर (खुलताबाद) जि. छत्रपती संभाजीनगर येथील जगद्गुरु जनार्दन स्वामी मौन रोजी महाराज यांच्या ३४ व्या पुण्यस्मरणार्थ श्री क्षेत्र नाशिक (तपोवन) कुंभमेळा मैदान याठिकाणी दि. १७ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२३ पासुन सुरु होणाऱ्या जय श्री राम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा या कार्यक्रमच्या भक्त फेरी निमीत्त जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री.श्री. १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे आज दि.१८ नोव्हेंबर २०२३ शनिवार रोजी संध्याकाळी ठिक- ०५ वाजता यावल तालुक्यातील सांगवी खुर्द (माय सांगवी) येथे आगमन होणार आहे.[ads id="ads1"]

           तिथे संध्याकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत जद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांची सांगवी खुर्द गावातुन पालखी मिरणवणुक होणार असुन त्यानंतर ६ ते ९ वाजेपर्यंत नित्यनियम विधी आरती व प.पु.महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीज यांचे प्रवचन होणार आहे. व तेथुन स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे रात्री १० वाजता यावल येथील श्री व्यास मंदीराकडे प्रस्थान होणार असुन तेथे महाराजांचा मुक्काम होणार आहे.[ads id="ads2"]

      रविवार दि.१९ रोजी सकाळी यावल येथील श्री व्यास व श्री राम मंदीर मंगल कार्यालयात सकाळी ५ ते ८ वाजे पर्यंत प.पु.जनार्दन स्वामींजीची नित्य नियम विधी आरती व प.पु.शांतीगिरीजी महाराजांचे प्रवचन होणार आहे.व त्यानंतर महाराजांचे पुढील कार्यक्रमा कडे प्रस्थान होणार आहे.तरी  पंचक्रोशीतील

सर्व भाविक भक्तांनी प.पु.स्वामी शांतिगीरीजी महाराज यांच्या प्रवचनाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान समस्त जय बाबाजी भक्त परिवार यावल ( व्यासनगरी ) तालुका तर्फे करण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!