यावल (सुरेश पाटील) पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील गुन्हेगारीचा,अवैध धंद्यांचा, गटातटातील भांडण तंटे,अवैध भिसी आणि अवैध सावकारी इत्यादी घडणाऱ्या घटनांचा आढावा घेतला असता राजकारणाच्या,आणि वाढत्या गुन्हेगारीच्या ९०% प्रभावामुळे होणारे भांडण तंटे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत यात राजकीय प्रभावामुळे आणि हीत संबंधामुळे आपापसात समन्वय साधला जात असल्याने तसेच पोलिसांना स्वतः फिर्यादी होण्यास मोठे अडथळे निर्माण होत आहे, पर्यायी यामुळे जातीय सलोखा,कायदा सुव्यवस्था व शांतता धोक्यात आली असताना मात्र समाजसेवक आणि काही लोकप्रतिनिधी गप्प बसून असल्याने हे यावलकरांचे दुर्भाग्य असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.[ads id="ads1"]
गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी यावल शहरात दोन गटात तुफान हाणामारी झाली या घटनेत दोन्ही गटात खून का बदला खून अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. घटनेमागील मुख्य कारणे लक्षात घेता भांडण नेमके कोणाच्या आशीर्वादामुळे आणि कोणाच्या संपर्कात असल्यामुळे,उद्योगधंद्यामुळे झाले आणि त्याची हिंमत कोणामुळे वाढली इत्यादी प्रश्न उपस्थित असताना जनमानसातून कौतुक सुद्धा करण्यात आले,या सुसाट वेगाने धावणाऱ्या वृत्ती विरोधात यावल पोलिसांचे दुर्लक्ष कोणामुळे व का होत असते..? याबाबत सुद्धा चर्चा सुरू आहे.[ads id="ads2"]
आता पुन्हा यावल शहरात अवैध चालणाऱ्या भिशीमध्ये १ लाख ८० हजार रुपयाचा घपला झाल्याने आपआपसात धमक्या देणे सुरू झाले असून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भिशी चालवणाऱ्यांमध्ये राजकारणाशी संबंधित आणि काही गरजू कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी आहेत यांची यादी यावल पोलीस गोपनीय विभागाने आहे किंवा नाही तसेच यावल पोलिसांनी या अनधिकृत भिशी चालवणाऱ्या प्रमुखांचे जाब जबाब चौकशी व खात्री करून पुढील कारवाई तात्काळ करावी असे सुद्धा यावल शहरात बोलले जात आहे.
यावल शहरात अनेक टार्गेट मुलं आपली दुचाकी वाहने सुसाट वेगाने अत्याधुनिक सायलेन्सर बसवून आणि कर्कश आवाजात दादागिरीने पोलिसांच्या नाकावर टिचून हिंडत राहून, ठिकठिकाणी सार्वजनिक जागांवर टोळकेचे टोळके उभे राहून शाळा कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थिनींची, आणि अनेक महिलांची छेडखानी,विनयभंग खुलेआम करीत आहेत याचा बंदोबस्त करावा करावा अशी सुद्धा संपूर्ण यावल शहरातून मागणी होत आहे.


