यावल (सुरेश पाटील)
आज शुक्रवार दि.3 रोजी यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इयत्ता तिसरी व सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण [स्टेट एज्युकेशनल अचिव्हमेंट सर्व्हे ( SEAS ) ] ची परिक्षा घेण्यात आली.सौ.सीमा सातघरे मॅडम व पंढरीनाथ महाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा घेण्यात आल्या.[ads id="ads1"]
संस्थाअध्यक्ष राजेंद्र महाजन सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या परिक्षा पार पडल्या प्रशांत फेगडे सर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्गांचे या परिक्षेसाठी सहकार्य लाभले.विद्यार्थ्यांनी अत्यंत शांत,शिस्तबद्ध पद्धतीच्या वातावरणात परिक्षा देऊन उत्तम सहकार्य केले.


.jpg)