यावल (सुरेश पाटील) : तालुक्यात जिल्हा परिषद आणि खाजगी शाळां मधील विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या पोषण आहाराची बाधा ( चौकशी न झाल्याने ) शिक्षण विभागाला होणार असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.[ads id="ads1"]
जिल्हा परिषद व खाजगी शाळांमध्ये पोषण आहार दिला जातो तो अनियमित आणि शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणात तसेच दैनंदिन निश्चित ठरवून दिलेला पोषण आहार दिला जातो किंवा नाही..? विद्यार्थ्यांची पटसंख्या सोयीनुसार दाखविल्यानुसार आणि कमी प्रमाणात दिलेला पोषण आहारामुळे शिल्लक राहिलेल्या पोषण आहाराचे काय होते..?[ads id="ads2"]
हा फक्त कागदोपत्री बनावट दस्तऐवजाचा खेळ ( ऑनलाइन रिपोर्ट ) सुरू असल्याक्या कारणावरून सामाजिक संघटनेने पुढाकार घेत लक्ष केंद्रित करून बाल विकास विभागामार्फत चौकशी सुरू होणार असल्याने याची बाधा आता यावल पंचायत समिती शिक्षण विभागापासून वरिष्ठ स्तरापर्यंत होणार असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.


