यावल (सुरेश पाटील) यावल येथील न्यू एकता चौकात रावेर विधानसभा मतदार संघातील भावी आमदार धनंजय शिरीषदादा चौधरी यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत परिसरातील तरुणांच्या व नागरिकांच्या उपस्थितीत सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यात आले.[ads id="ads1"]
सालाबादा प्रमाणे यावल शहरात दि.३१ऑक्टोबर २०२३ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त न्यू एकता चौकात प्रतिमा पूजन करून मिरवणूक काढण्यात आली.या प्रसंगी भावी आमदार धनंजय शिरीष चौधरी हे उपस्थित होते.[ads id="ads2"]
उत्सव समिती अध्यक्ष:-राजूभाऊ करांडे तसेच उपाध्यक्ष - चेतन फेगडे,माजी नगराध्यक्ष राकेश कोलते,समाज सेवक धिरज महाजन,प्रगतिशील शेतकरी प्रमोद शेठ नेमाडे,पराग शेठ बोरोले,अभय शेठ जंगले,तसेच सर्व समाज बांधव व यावल शहरातील वरिष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत सरदार वल्लभ भाई पटेल जयंती साजरी करण्यात आली सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.



