मा. ना. पालकमंत्री, जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांच्या पाठपुराव्याचे फलित
यावल (सुरेश पाटील) : जिल्हा वार्षिक योजना (जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम ) अंतर्गत सन 2023-241 करिता अर्थसंकल्पीय निधी 55 कोटी 91 लाख रुपये रुपये बजेट निधीमधुन 30 कोटी 34 लाख रुपये निधी बीडीएस प्रणालीवर शासनाकडुन उपलब्ध करुन देण्यांत आला आहे. यापैकी दिनांक 06 नोव्हेंबर 2023 पर्यंत 16 कोटी 43 लाख निधी बीडीएस प्रणालीवर खर्च झालेला आहे. उपलब्ध निधीशी खर्च झालेल्या निधीची टक्केवारी 54.17 टक्के आहे. तसेच अर्थसंकल्पीत निधीशी खर्चाची टक्केवारी 29:39 टक्के असून निधी खर्चामध्ये प्रकल्प कार्यालय यावल जि. जळगांव राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.[ads id="ads1"]
यासाठी मा.ना. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन, मा. ना. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मा. ना. मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सुचना लोकप्रतिधीचे सहकार्य, मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा जिल्हा नियोजन समिती कार्यालय आदिवासी विकास विभाग अपर आयुक्त कार्यालय, जिल्हा नियोजन समितीच्या सर्व कार्यान्ववीत यंत्रणेच्या उत्कृष्ट कामामुळे तयेच प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार व यावल येथिल कर्मचारी यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे निधी खर्चात प्रकल्प कार्यालय यावल राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.[ads id="ads2"]
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी कालमर्यादेत खर्च करण्यासाठी नियोजन समितीनें । सष्टेंबर ते 10 डिसेबंर 2023 असा 100 दिवसांचा कालाबंध्द कार्यक्रम आखला होता. या कालबध्द कार्यक्रमात प्रशासकीय मान्यता, निविदा प्रकिया कार्यारंभ आदेश व निधी प्राप्त करुन खर्च करण्यांच्या सुचना मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वेळोवेळी दिल्या होत्या यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजात गतीमानता आली. निधी वितरीत कामांचे कार्यारंभ आदेश काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. कार्यान्वयन यंत्रणांनी वेळेत गुणवत्तापूर्ण काम करण्यांवर भर द्यावा. अशा सुचना मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.