प्रा.नरेंद्र मुळे यांना क ब चौ उ म वी जळगाव तर्फे पी.एच.डी. पदवी बहाल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : म्हणतात ना कुछ किये बिना ही जय जयकार नही होती कोशिश करने वालो की कभी हार नही होती* याचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रा. नरेंद्र मुळे हे रावेर तालुक्यातील करहाळे गावाचे रहिवासी आहे.  प्रा.नरेंद्र काशिनाथ मुळे यांची PhD मौखिक परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न झाली व त्यांना इंग्रजी विषयात विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्यात आली.[ads id="ads1"]

   *स्टडी ऑफ कल्चरल कन्फर्मेशन इन द सिलेक्ट नोवेल्स ऑफ चीनेवा अचेबे अँड चिमामंडा नगोझी एडीके* हा त्यांचा संशोधनाचा विषय असून समाजामध्ये असलेली विभिन्नता आणि सांस्कृतिक वाद मीटवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यांचेही संशोधन आफ्रिकेतील नायजेरिया मधील संस्कृतीवर असून त्या संस्कृतीचा ऱ्हास आणि दमण पश्चिमात्य लोकांकडून कशा पद्धतीने झाले हे दर्शवणारे आहे.[ads id="ads2"]

   ते अत्यंत सामान्य कुटुंबातील असून जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर, आणि आई वडिलांच्या आशिर्वादाने त्यांनी हे यश संपादन केले आहे.  त्यांच्या यशामध्ये त्यांचे संशोधन मार्गदर्शक म्हणून डॉ. पी. जी सोनवणे नरडाणा कॉलेज यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशात बी.ओ.एस. चेअरमन डॉ. प्रा. बी. एन. केसुर, डॉ. अविनाश बडगुजर, सरदार वल्लभ भाई पटेल ऐनपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, डॉ. आर. व्हीं . भोळे सर व संपूर्ण महाविद्यालयाचे, क.ब .चौ. उ. म. वि. जळगाव संशोधन विभागाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!