सावदा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवस-रात्र अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला यावर्षी ७४ वर्षे पुर्ण होत असुन त्यानिमित्ताने आज दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी संविधानाच्या बाबतीत जनजागृती व्हावी म्हणून “रिस्पेक्ट टू प्रियांबल” या अभियाना अंतर्गत “समतापथिक संविधान प्रज्ञाशोध परीक्षा” आयोजित करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षापासून 'रिस्पेक्ट युथ फाऊंडेशन' तर्फे या परीक्षेचे आयोजन यशस्वीरित्या केले जात आहे. इयत्ता ५वी ते १० वी लहान गट आणि इयत्ता ११वी ते पुढील हा मोठा गट अशा दोन गटांसाठी ही परीक्षा आयोजीत केली जाते. यावर्षी सुध्दा सावदा सह रावेर, यावल तालुक्यातील जवळपास ४३२ विद्यार्थ्यांनी यामध्ये उस्फुर्त सहभाग नोंदवून ही परीक्षा दिली. सदर परीक्षेद्वारे भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, देशाच्या येणाऱ्या पिढीने संविधानाचा अभ्यास करून योग्य ते ज्ञान जतन करून ठेवावे, भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला आपल्या हक्क आणि अधिकारांसोबतच कर्तव्याची जाण व्हावी या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात येते. आज झालेल्या या परीक्षेचा निकाल हा २६ नोव्हेंबर २०२३ वार रविवार रोजी जाहीर होणार आहे.[ads id="ads1"]
यावेळी येणारा २६ नोव्हेंबर हा "संविधान दिन" मोठ्या उत्साहात साजरा करून लोकशाही संपन्न करू या, असे आवाहन यावेळी रिस्पेक्ट युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे सर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला अर्पण केली. त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या विषयी समाजामध्ये पुरेशी जागरूकता नसल्याने लोकशाहीवर निष्ठा असलेल्या संघटनांच्या मागणीनुसार राज्य सरकारने २००८ मध्ये शासकीय अध्यादेश काढला आहे, अशी माहिती रिस्पेक्ट युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे सर यांनी दिली.[ads id="ads2"]
संविधान दिन साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलेला असला, तरी संविधान दिन साजरा करण्याबाबत मोठी उदासिनता दिसून येते. केवळ शासकीय पातळीवर हा दिवस साजरा केला जात असून संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शासकीय कार्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर संविधान दिन साजरा करून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करावी, असे आवाहन अनोमदर्शी तायडे सर यांनी केले.
रिस्पेक्ट युथ फाउंडेशन तर्फे स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर १०० मार्कांसाठी भारतीय राज्यघटनेवर आधारित १०० प्रश्नांची ही परीक्षा अत्यंत शिस्तीत राबवली जाते. सदर परीक्षेला सावदा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पळे साहेब, पो. हे. कॉ. उमेश पाटील, पो. हे. कॉ. यशवंत टहाकळे, सावदा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सपकाळे सर यांनी भेट दिली. दोन्ही गटांच्या प्रश्नपत्रिका, प्रश्नांचे स्वरूप, उत्तर पत्रीकांची सुसूत्रता, बैठक व्यवस्थेचे नियोजन हे सर्व बघून मान्यवरांनी 'रिस्पेक्ट फाउंडेशन' तर्फे आयोजित केलेल्या या परीक्षेचे कौतुक करत भविष्यासाठी सदिच्छा दिल्या. सदर परीक्षेच्या यशस्वीतेसाठी रिस्पेक्ट युथ फाऊंडेशनचे सदस्य ॲड. योगेश तायडे, ॲड. आनंद वाघोदे, सिद्धार्थ तायडे, पंकज बोदडे सर , सोनू मेढे, ईश्वर लहासे, शंकर बोदडे, अमोल वाघ, सिध्दांत तायडे, नितीन झाल्टे सर, चेतन लोखंडे, करण तायडे, भुषण मेढे, प्रताप तायडे, अक्षय तायडे, अक्षय सुरवाडे, अजय तायडे, गणेश मेढे, दिपक बोदडे, शुभम अढायगे, ईश्वर सुरवाडे, विकास तायडे, विक्रम तायडे, आशुतोष भालेराव,प्रतिक मेघे,योगेश सोनवणे, शिरीष वाघोदे, विजय भालेराव सर, अजय कोसे,पंकज तायडे आदींनी परिश्रम घेतले.


