यावल तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

मुंबई येथील उपोषणाला मोठ्या संख्येने पोलीस पाटील जाणार

फैजपुर प्रतिनिधी(सलिम पिंजारी) :  यावल तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक  संपन्न झाली.मुंबई येथे होणाऱ्या संघटनेच्या उपोषणाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी जास्तीत जास्त पोलीस पाटील जाणार असल्याचा निर्धार करण्यात आला तसेच प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"]

  २८ नोव्हेंबर ते १ डिसेंम्बर दरम्यान राज्यातील पोलीस पाटील बांधवांच्या विविध मागण्यांसाठी म.रा.गां.का.पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण व धरणे आंदोलन होणार आहे.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पोलीस पाटील यांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन. जिल्हा कार्याध्यक्ष अशोक पाटील. जिल्हा उपाध्यक्ष पवन चौधरी. पोलीस पाटील सुरेश खैरनार. राजरत्न आढाळे. लक्ष्मण लोखंडे. नरेश मासोळे. प्रफुल्ला चौधरी. युवराज पाटील. ललिता भालेराव. मुक्ता गोसावी. महमूद तडवी. सलीम तडवी. निलेश सोनवणे. उपस्थित होते बैठकीचे नियोजन जिल्हा संघटक अशोक पाटील यांनी केले.[ads id="ads2"]

  राज्यातील पोलीस पाटील यांच्या काही प्रमुख मागण्या अनेक वर्षांपासुन शासन दरबारी प्रलंबीत आहेत. त्या मान्य होण्यासाठी म.रा.गां. का. पोलीस पाटील संघातर्फे मंत्रालयात बैठका, निवेदने, भेटीसाठी पत्रव्यवहारासह लोकशाही मार्गाने पाठपुरावा करीत आहोत. परंतू अद्याप पर्यंत शासनाने त्यावर योग्य निर्णय घेतला नसल्याने संघटनेने उपोषणाचा मार्ग निवडला आहे.*या आहेत प्रमुख मागण्या-*१) पोलीस पाटीलांचे मानधनात वाढ करुन ते दरमहा किमान रु.१८०००/- (अक्षरी अठरा हजार रुपये) मिळावे.*२) ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करण्यास प्राधान्य देण्यात यावे.*३) निवृत्तीचे वय ६० वर्षावरुन ६५ वर्षापर्यंत करण्यात यावे.*४) निवृत्ती नंतर किमान २५,००,०००/- (पंचवीस लाख रुपये) ठोस रक्कम मिळावी.*५) नुतनिकरण पहिल्या पाच वर्षानंतर पुढे कायमचे बंद करण्यात यावे.*६) गृह व महसुल विभागातील पद भरतीमध्ये पोलीस पाटील व त्यांच्या वारसांना पात्रतेनुसार आरक्षणाचा लाभ मिळावा.*७) शासनातर्फे पोलीस पाटीलांचा २०,००,०००/-रु. (वीस लाख रुपये) चा विमा उतरवण्यात यावा व त्याचे हप्ते शासनातर्फे भरण्यात यावे.*८) शासनाकडुन पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना मेडिक्लेमचा लाभ मिळावा.*९) प्रवास भत्ता व स्टेशनरी साहित्य खर्चासाठी दरमहा ३०००/-रु. (तिन हजार रुपये) मानधना सोबतच मिळावेत.*१०) पोलीस स्टेशन व पोलीस चौकी असलेल्या व नव्याने शहरीकरण झालेल्या गावातील कार्यरत पोलीस पाटीलांना त्यांच्या निवृत्तीकाळा पर्यंत कायम ठेवण्यात यावे, त्यांची पदे खंडित करु नये११) आपिलांचे निकाल पोलीस पाटीलांच्या बाजुने लागुनही त्यांना पुन्हा पदभार देण्यास दिरगांई केली जाते. ती टाळावी व त्यांना तात्काळ पदभार देण्यात यावा.

    या व इतर मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार,पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यावल, फैजपूर. यांना देण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!