जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व अंतर्गत जळगाव तालुका शाखेच्या वतीने कांचन नगर परिसर, जळगाव येथे आज उपासिका कांचन नगर परिसर, जळगाव येथे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस आद. प्रा. आनंद ढिवरे, जिल्हा कार्यालयीन सचिव आद. सुभाष सपकाळे गुरुजी, जिल्हा संघटक आद. बी एस पवार गुरुजी, प्रमुख मार्गदर्शिका वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका आद. लताताई तायडे, केंद्रीय शिक्षिका माधुरीताई भालेराव व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी आद. राजेश इंगळे तालुका अध्यक्ष, आद. यशवंत तथा सुपडू जाधव तालुका कोषाध्यक्ष, आद. सागर दादा सदावर्ते तालुका उपाध्यक्ष पर्यटन विभाग, आद. शैलेश सोनवणे तालुका संस्कार सचिव, आद. चैत्राम भालेराव तालुका संघटक, आद. दिलीप डोंगरे तालुका संघटक तसेच सचिन तायडे, संजय बिऱ्हाडे, जय सोनवणे, पराग भालेराव, यशवंत भालेराव, आनंदा सोनवणे, शेषराज जगताप आदी उपस्थित होते.[ads id="ads1"]
कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ मार्गदर्शक जिल्हा शाखेचे संघटक आद. बी एस पवार सर यांनी भूषविले. तर कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा कार्यालयीन सचिव आद. सुभाष सपकाळे गुरुजी होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष आद. राजेश इंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कोषाध्यक्ष आद. यशवंत तथा सुपडू जाधव यांनी केले आणि आपल्या गीताच्या माध्यमातून प्रबोधन सुद्धा केले. जिल्हा कार्यालयीन सचिव आद. सुभाष सपकाळे गुरुजी आणि शिबिराच्या प्रमुख मार्गदर्शिका आद. लताताई तायडे आणि आद. बी. एस. पवार गुरुजी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून रीतसर उद्घाटन करण्यात आले.[ads id="ads2"]
त्यानंतर तालुका कार्यकारणीच्या वतीने मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले, तसेच सामाजिक परिवर्तन संघाच्या सदस्यांचे सुद्धा पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व सामुदायिक रित्या पुष्पांची उधळण करून महिला उपासिकांचे स्वागत करण्यात आले.
*या ठिकाणी जिल्हा सरचिटणीस आद. प्रा.आनंद ढिवरे सर, जिल्हा कार्यालयीन सचिव आद. सुभाष सपकाळे गुरुजी, केंद्रीय शिक्षिका माधुरीताई भालेराव यांनी शिबिरास उपस्थित उपासिका यांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आद. बी.एस. पवार गुरुजी यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले आणि आद. सागर दादा सदावर्ते यांनी आभार मानून पहिल्या सत्राचा समारोप करण्यात आला.
यानंतर आद. लताताई तायडे यांनी उपस्थित धम्म उपासिकांना त्रिसरण पंचशील, त्याचा अर्थ या विषयावर मार्गदर्शन केले आणि पाच वाजता या कार्यक्रमाचा समारोप झाला.शेवटी तालुक्याच्या वतीने चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला.


