रावेर ( चांगो भालेराव) : बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवस रात्र खूप परिश्रम घेऊन देशातील राज्य घटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला या वर्षी 74 वर्ष पूर्ण होत असून संविधानाच्या बाबतीत जनजागृती झाली पाहिजे देशाच्या येणाऱ्या तरुण पिढीने संविधानाचा कायद्याचा अभ्यास करून योग्य ते ज्ञान जतन करून ठेवावे भारतीय नागरीक म्हणून प्रत्येकाला आपल्या हक्क आणि अधिकारासोबतच कर्तव्याची जाण व्हावी. म्हणुन संविधान दिवस साजरा केला जातो.[ads id="ads1"]
26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्य घटना देशाला अर्पण केली त्यानंतर दोन महिन्यांनी 26 जानेवारी 1950 पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली. संविधान विषयी जन जागृती व्हावी म्हणून संपुर्ण भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यात सुरुवात झाली असे दुय्यम निबंधक डी व्ही बाविस्कर यांनी आपल्या मनोगतात म्हंटले.[ads id="ads2"]
संविधान दिन हा सर्व देशातील शाळा महाविद्यालय विद्यापीठे शासकीय कार्यालय संस्था यामध्ये सादर करण्यात यावा .असे सांगून हात पुढे करत भारताचे संविधान उद्देशिका वाचून दाखवले. कार्यालयात उपस्थित आयटीआय भास्कर पाटील आय .टी.आय. जयवंत सोनार सावदा व रावेर चांगो भालेराव. जुम्मा तडवी. रवींद्र पाटील. किशोर पाटील. सुनील सोनार सुरेश पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


