रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : आज दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी ग्रा. पं. कार्यालय व आठवडे बाजार बसस्टॅंड परिसर येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला सर्व प्रथम विश्वरत्न, महामानव,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विटवे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच आयु. मुकेश चौधरी यांचे हस्ते पुष्प हार अर्पण करुण, धुप, पूजा, त्रिसरण पंचशील घेऊन, संविधान प्रस्ताविक सामूहिक रित्या घेण्यात आले.[ads id="ads1"]
या वेळी नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य व सरपंच यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र वानखेडे यांनी प्रस्ताविक केले व ग्रा. पं. सदस्य, साहेबराव वानखेडे यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की भारतीय संविधाना मुळेच आपला सर्वांचा विकास झाला, भारतीय संविधान एका जाती धर्मासाठी नसून सर्व भारतीयांसाठी आहे असे मनोगत व्यक्त केले यावेळी सूत्र संचलन सिताराम वानखेडे यांनी केले तर आभार धिरज पानपाटील यांनी मानले.[ads id="ads2"]
याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य ईश्वर चौधरी, गणेश मनुरे,मधुकर पाटील, गजानन कोळी,सुरेश कोळी, विमल भिल्ल, कैलास मनुरे, पोलिस पाटील बाळु पवार, रेखाबाई वानखेडे,प्रमिला अढागळे , प्रल्हाद अढागळे, भूरा पाटील, सुरेश अढागळे, सुनील वानखेडे, सुपडु वाघ, प्रमोद कोळी, श्रीराम कोळी, योगेश वानखेडे, योगेश लहासे, ईश्वर वानखेडे, व गावातील विद्यार्थी, तरुण, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


