जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दि. 26.11.2023 रोजी कुशीनगर येथे श्रावक धम्मा टूर्स च्या वतीने संपन्न करण्यात आला...सुरवातीला कुशीनगर मधील महापरीनिर्वाण स्तुपा मध्ये भ.बुद्ध यांच्या मूर्तीस मोठे चीवर चढवले , नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.[ads id="ads1"]
नंतर धम्म पर्यटना मध्ये उपस्थित असलेले पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले....धम्म पर्यटणाचे प्रमुख व आयोजक...सारिपुत्त गाढे यांनी भारतीय संविधान या विषयावर मार्गदर्शन केले, संविधानाचे महत्व विषद केले.[ads id="ads2"]
सदर कार्यक्रमास धुळे, जळगाव,भुसावळ, देवपूर,अंमळनेर,आयुद्ध निर्माणी वरणगाव,मुक्ताईनगर,खामगांव,अकोला, औरंगाबाद,नाशिक,मनमाड,व संपूर्ण महाराष्ट्रातून 50 धम्म पर्यटक उपस्थित होते.विशेष म्हणजे धम्म पर्यटन चालू असताना संविधान दिन साजरा करण्यात आला.


