भुसावळ:- येथे आज उत्तर विभागात कृष्णा चंद्र हॉल मध्ये वंचित बहुजन आघाडी चा जिल्हा स्तरीय युवकांचा पक्ष प्रवेश सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी वंचित बहुजन कंत्राटदार संघटना कडून सुजात आंबेडकर यांचे स्वागत प्रदेश अध्यक्ष प्रकाश सरदार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.[ads id="ads1"]
या कार्यक्रमास युवकांना सुजात आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले तर प्रमुख उपस्तित मध्ये राज्य युवा उपाध्यक्ष शमीभा पाटील,जळगाव निरीक्षक रविकांत वाघ,जळगाव पश्चिम चे जिल्हा अध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हा जळगांव पूर्व अध्यक्ष बाळा पवार, महिला जिल्हा अध्यक्ष वंदना सोनवणे,देवदत्त मकासरे, विश्वनाथ मोरे, समाधान गवई, युवा जिल्हा अध्यक्ष जळगांव पश्चिम चे जितेंद्र केदारे, भारतीय बौद्ध महासभा च्या महिला अध्यक्ष प्रियांका अहिरे, महाराष्ट्र च्या सचिव लता तायडे, जिल्हा हिशोब तपासणीस सुमंगल अहिरे, सिमा अहिरे, वंचित च्या माजी जिल्हा अध्यक्ष वंदना सोनवणे, इत्यादी सह शेकडो कार्यकते उपस्तित होते. कार्यक्रम चे सूत्रसंचालन बाळा पवार यांनी केले