"लोकांची समस्या लवकर सुटली पाहिजे, यानिमित्ताने दि.१० नोव्हेंबर रोजी समाजसेवक सोहेल खान सैदुल्ला खान यांनी पालिकेचे आरोग्य अधिकारी सचिन चोळके व पाणीपुरवठाचे अवी पाटील यांच्याशी चर्चा केली.व समस्या लवकर न सुटल्यास जनहिताकरीता पालिके समोर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला."[ads id="ads1"]
---------------------------------------
सावदा ता.रावेर वार्ताहर (युसूफ शाह)
सावदा :- येथील नगरपालिका हद्दीतील ताजुशशरिया मस्जिद परिसर व मोहुम्मदिया नगर या भागात लाखों रुपये खर्चून पाईप लाईन टाकलेली असून,त्या पाईप लाईन मध्ये पाणी येत नसून येथील रहिवासी करदाते तथा नागरिकांना पिण्याच्या पाणीसाठी नेहमी भटकंती करावी लागते.तसेच याबाबतची संपूर्ण माहिती अनेक दिवसांपासून पालिका प्रशासनास असून सुद्धा या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या आजतागायत संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणत्याही ठोस उपायोजना करण्यात आली नाही.तसेच या भागातील गटारींची नियमित साफसफाई केली जात नाही.यामुळे गटारीत कचरा अडकून राहत असल्याने गटरीतून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर पसरत असते,तरी येथे असलेली ताजुस्सशशरिया मस्जिद मध्ये नमाजपठणास जाणाऱ्या लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो,तसेच या अस्वच्छते मुळे येथे मोठ्या प्रमाणावर विषारी डांस, मच्छरांचा साम्राज्य निर्माण होऊन येथील रहिवासी लोकांच्या आरोग्यास मोठा दुकान निर्माण झाल्याबद्दल आज दि.९ नोव्हेंबर रोजी पालिकेचे आरोग्य अधिकारी सचिन चोळके यांना समस्याग्रस्त महिला व पुरुषांनी निवेदन सादर केले.[ads id="ads2"]
याप्रसंगी शेख अनीस इब्राहिम,ॲड.जावेद शेख,मोईन लाला,सह ५० ते ६० महिला व पुरुष उपस्थित होते.तसेच हीच समस्या शहरातील अनेक रहिवासी भागात देखील दिसून येते.वेळेवर शहरातील गटारींची साफसफाई केली जात नाही.ओला,सुका कचऱ्यांची उचल करण्यासाठी कोणत्या वेळेत घंटागाड्या येते याचा बोध नागरिकांना होत नाही.काही घंटागाड्या नादुरुस्त दिसून येते.तसेच संबंधित ठेकेदाराशी करार केल्याप्रमाणे आढळून आलेली अनियमितताची पूर्ती करून घेणे बाबत मुख्याधिकारी कडून काही हालचाली दिसून येत नाही.सदरील असुविधा बाबत सर्वसामान्य जनते कडून तोंडी व लेखी तक्रारी प्राप्त असून सुद्धा शहरात सर्व काही स्वच्छ व सुरळीत कारभार सुरू असल्याचे चित्र या पालिका प्रशासनाच्या वतीने कागदोपत्री दाखवून संबंधित ठेकेदारास मात्र लाखोंची बिले अदा केली जाते.तसेच एकीकडे पालिका प्रशासन कडून जनतेची समस्या सोडविली जात नाही.तर दुसरीकडे पालिकेवर प्रशासकीय राज असल्यामुळे की काय?परंतु याकडे लोकसेवकांनी देखील पाठफिरल्याचे समस्याग्रस्त नागरिकाकडून बोलले जात आहे.
तरी सध्या प्रभारी मुख्याधिकारी म्हणून पालिकेला लाभलेले वरणगाव पालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख यांनी याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.