सातपुड्यात आदिवासी बांधवांसोबत फेगडे परिवाराने साजरी केली दिवाळी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 सातपुड्यात आदिवासी बांधवांसोबत फेगडे परिवाराने  साजरी केली दिवाळी

उपक्रमातुन येणाऱ्या पिढीस समाजाप्रती दायित्वाचे संस्कार : डॉ. कुंदन फेगडे

यावल (सुरेश पाटील)

सालाबादा प्रमाणे या वर्षी देखील यावल शहरातील फेगडे कुटुंबीयांनी आदिवासी विटवा पाडा तालुका यावल येथे आदिवासीं परिवार सोबत दिपोत्सव साजरा केला. आदिवासी पाड्यावर घेण्यात आलेल्या या कार्यक्रमातुन येणाऱ्या पिढीस समाजाप्रती दायित्वाचे संस्कार घडावे या उद्देशाने सहकुटुंब दिवाळी आपण गोर,गरीब,गरजुंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला असे या प्रसंगी आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी सांगीतले.[ads id="ads1"]

विटवा पाडा ता.यावल येथे आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी आपला दिवाळी सण आदिवासी दुर्गम परिसरातील आदिवासी परिवारासोबत  सहकुटुंब साजरा केला.सर्वत्र दिवाळी साजरी होत असतांना समाजातील अतिदुर्गम भागातील आदिवासी,गोर, गरीब कुटुंबं मात्र या आनंदापासून दूर असतात. या आदिवासी घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी.त्यांनाही काही क्षण आनंद मिळावा या उद्देशाने  व येणाऱ्या पिढीला देखील आपण समाजाप्रती देणं लागतो असे संस्कार घडावे या उद्देशातुन राबवत असल्याचे प्रसंगी डॉ.कुंदन फेगडे यांनी सांगीतले.[ads id="ads2"]

  तेव्हा आपल्याच सभोवताली अनेक असे गरीब होतकरू लोक असतात की त्यांना एकावेळेचे जेवणासाठी मोठी कसरत आणि मेहनत करावी लागते,त्यामुळे सण साजरे करणे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असतात. त्यांनाही वाटते की आपणही गोड खावे,नवीन कपडे घालावे मात्र त्यांच्या नशिबी नेहमी अंधार असतो.यामुळे सामाजिक बांधिलकीचे भान जपत अशा गरजूना आपण मदतीचा हात द्यावा म्हणुन दरवर्षी यावल-रावेर तालुक्यातील आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे हे आदिवासी वस्तीवर जावुन सहकुटुंब दिवाळी साजरी करीत असतात यंदा देखील त्यांनी विटवा आदिवासी पाड्यावर जावुन  फराळ,मिठाई आंघोळी करिता सुगंधी उटणे,साबण,पणती लहान मुलांना फटाके वितरण केले.यावेळी डॉ. कुंदन फेगडे, शैलेंद्र फेगडे,डॉ.जागृती फेगडे, दिनेश बारेला,सागर लोहार मनोज बारी,दिपक फेगडे सह आदिवासी बांधवांची परिवारासोबत मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!