खिर्डी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ७५ टक्के मतदान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांच्या रांगा

 रावेर ग्रामीण वार्ताहर (प्रशांत गाढे)

रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे रविवारी, ५ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीत ३ हजार १७२ पैकी २ हजार ३७९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली होती. [ads id="ads1"]

 L मतदानाविषयी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसुन येत होता. निवडणुकीसाठी गावात एकूण चार वॉर्ड होते. त्यातील वॉर्ड क्रमांक १ मध्ये ९७० पैकी ७६९, - वॉर्ड क्रमांक २ मधून ७४१ पैकी ५४२, वॉर्ड क्रमांक ३ मधून ७०५ पैकी ४६७ तसेच वॉर्ड क्रमांक ४ मधून ७५६ पैकी ६०१ असे मतदान झाले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ७५ टक्के झाली. [ads id="ads2"]

  सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठीनिंभोरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. ज्ञानेश्वर पाटील, रिजवान पिंजारी, स्वप्नील पाटील, पोलीस नाईक काजिम देशमुख, पंकज सोनवणे, प्रियांका नरवाडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. याप्रसंगी खिर्डी बुद्रुकचे पोलीस पाटील रितेश चौधरी, खिर्डी हेमंत जोशी, मंडळ अधिकारी प्रवीण नेहेते, ग्रामसेवक एस. आर. पाटील तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!