प्रोटॉन शिक्षक संघटनेकडून लक्ष्मणराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !...

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

धरणगाव :  येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलचे शिक्षक लक्ष्मणराव पाटील यांना प्रोटान शिक्षक संघटनेतर्फे 'राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्कार २०२३' देऊन गौरविण्यात आले.[ads id="ads1"]

                याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील अल्पबचत भुवन मध्ये RMBKS च्या प्रोटान संघटनेचे तिसरे अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा २०२३ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीला शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर समतेच्या आदर्शांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोटान जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव यांनी केले. सुरवातीला अधिवेशनात विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सखोल मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरण २०२० नेमके कसं आहे? याबाबत SNDT महाविद्यालय जळगाव चे प्रा.प्रकाश कांबळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तद्नंतर जिल्हाभरातील विविध शिक्षक शिक्षिका यांना 'राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले/ क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक/ शिक्षिका पुरस्कार २०२३' देऊन गौरविण्यात आले. यामध्ये धरणगाव येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलचे उपशिक्षक लक्ष्मणराव पाटील यांना देखील 'गुणवंत सत्यशोधक शिक्षक' पुरस्कार प्राप्त झाला.[ads id="ads2"]

               कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोटान चे राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे तर उदघाटक म्हणून माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून माध्य. शिक्षणाधिकारी विकास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी.पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, प्रोटानचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश वाडेकर, महासचिव मिलिंद निकम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चव्हाण यांनी तर आभार मुबारक शहा यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!