यावल दि.२९ ( सुरेश पाटील )
येथील श्रीराम व श्री व्यास मंदिरात आज बुधवार दि.२९ नोव्हेंबर २०२३अश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदा ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा,( त्रिपुरारी )दि.२७ पर्यंत भल्यापहाटे ५:३० वाजता काकड आरतीचा स्वर गुंजत होता.काकड आरती मध्ये श्री गणेश,श्रीराम, श्रीशिवशंकर देवांची भूपाळी होऊन श्रीपांडुरंगाची,श्रीरामाची आरती भाविक सुरेल आवाजात म्हणत होते.[ads id="ads1"]
यावेळेस भक्तगण मोठ्या संख्येत उपस्थित राहुन भजनाचा आनंद घेत होते.यावेळेस भाविकांमधये पुरूष तसेच महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.पुरूष भाविकांमधये काशीनाथ बारी,रमेश बोंडे,पंडीत अप्पा, राजू टेलर,श्रीरंग वाघ,अशोक बारी,रविंद्र तळेले,पांडुरंग लाड सुनिल माळी,अशोक चव्हाण, राजू पाचपांडे,रवींद्र शिर्के,हिरामण कुंभार,मनोज येवले,अजय गडे,पीतांबर सोनवणे आदी उपस्थित होते.[ads id="ads2"]
महिला भाविकांमधये सौ.विद्या महाजन,निशा प्रजापती,सुरेखा बारी,ज्योती पाचपांडे,सुनिता वानखेडे,ऊषाबाई चौधरी,सुभद्राबाई मांडोले,चंद्रभागा बाई,आशा वारूळे,अनूसयाबाई बारी आदी उपस्थित होत्या.एक महिन्यापासून भाविक काकड आरतीला हजर राहून आनंद घेत होते.नंतर दररोज भाविकांना काकड आरतीनंतर चहापान देण्यात येत होते.आज दि.२९ ला दुपारी१२ वा.नैवेद्य दाखवण्यात येऊन काकड आरती म्हणत श्री व्यासांचा जयजयकार करण्यात आला.संपुर्ण परिसर सुशोभित करण्यात आला होता.त्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुजारी बिल्लू महाराज,रमेश बोंडे ,गुरव अप्पा,अशोक पाटील,पवन पाटील,अजय गडे,अरूण फालक,आदींनी परिश्रम घेतले.शहरातील इतर नागरिकांनी कार्यक्रम यशस्वीते साठी सहकार्य केले रमेश बोंडे यांनी सर्वांचेच स्वागत व अभिनंदन केले व आभार व्यक्त करून काकड आरतीचा समारोप केला.



