लिखित आश्वासनानंतर सफाई कर्मचारी यांचे आंदोलन स्थगित

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : निंभोरा बु ग्रामपंचायती चे सफाई कर्मचारी यांना सुधारीत किमान वेतन व राहणीमान भत्ता लागु होणेसाठी दिनांक 28/11/ 2023 रोजी रावेर पंचायत समिती आवारात निंभोरा बु. तालुका रावेर येथील सफाई कर्मचारी उत्तम सप्रेबन, देवेंद्र आदिवाल, रजनी सप्रेबन, सुनंदा आदिवाल यांचे बेमुदत उपोषण सुरु होते.

   रावेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी माननीय प्रविण शिंदे,निभोरा बू. चे सरपंच सचिन महाले व ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील यांनी १५ दिवसाचे आत मासिक मीटिंग घेवुन सुधारित किमान वेतन लागू करण्याचे आश्वासन दिल्याने सदरचे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. 

  यावेळी  महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना 682 प्रभारी राज्याध्यक्ष श्री.विजय रल, तालुका अध्यक्ष दिलीप पंडित, ता.सचिव सुरज नरवाडे, उपाध्यक्ष प्रदीप महाजन, अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रशांत आदिवाल, कार्यध्यक्ष दिलीप भाऊ पंडित, मेहतर समाज सरपंच श्री प्रकाशजी आदिवाल, शामजी आदिवाल, सुरेश रल, विनोद रल, बजरंगी कंडारे, मुकेशजी परिहार, महेंद्र तायडे यांच्या उपस्थतीमध्ये उपोषण सोडविण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!