रावेर तालुका प्रतिनिधी -विनोद हरी कोळी
रावेर तालुक्यातील कांडवेल, ते कोळदा हा रस्ता खूप रहदारीचा आहे.हा रस्ता संपूर्ण दुरुस्तीसाठी तालुक्यातील ठेकेदार, (महिंद्रा पाटील) यांना दिला होता.परंतु ,या ठेकेदाराने आठ महिने आधीपासून हा संपूर्ण रस्ता खोदून विस्पडित केला असता, त्या रस्त्याने रहदारी करणाऱ्या मजुरांना व्यवस्थित पायी चाललं जात नाही.तसेच मोटर सायकल घेऊन प्रवासी अनेक वेळा ते रस्त्याने पडले. अनेक वेळा अपघात झाले.[ads id="ads1"]
हे सर्व घडत असताना, याला जबाबदार ठेकेदार? की सार्वजनिक बांधकाम विभाग, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.या कारणांमुळे नागरिकांचा मनस्ताप खूप वाढला आहे .रस्ता दुरुस्ती करण्याबाबत ठेकेदार कामचुकारपणा करत आहेत.तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत .याला पूर्णपणे जबाबदार ठेकेदार ,तसेच ठेकेदार रस्ता दुरुस्ती करण्याकडे कामचुकारपणा करत असेल तर, त्याचे प्रशासनाने त्वरित लायसन रद्द करण्यात यावे.[ads id="ads2"]
याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी आहेत .तसेच कांडवेल फाटा ते कोळदा पर्यंत संपूर्ण रस्ता आठ दिवसाच्या आत दुरुस्त न झाल्यास, तसेच अपघाताने एखादी व्यक्ती मरण पावल्यास, किंवा बरे वाईट झाल्यास, याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी असेल.असे मत संतप्त नागरिक यांनी यावेळी व्यक्त केले आहेत.



