अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पळवून नेल्याने 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

यावल  ( सुरेश पाटील)

अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेले ट्रॅक्टर यावल तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी नेत असताना पळून नेल्याने तलाठी यांनी फिर्याद दिल्यानुसार यावल पोलीस स्टेशनला दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.[ads id="ads1"]

याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील साकळी येथील तलाठी मिलिंद वासुदेव कुरकुरे यांनी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की,आज रविवार दि.24/12/2023 रोजी 11.25 वा.साकळी येथुन मला चुंचाळे मार्गे किनगांवला जावयाचे होते.म्हणुन मी चुंचाळे गावात आलो असता मला गावातील दिपक नेवे, विक्की वानखेडे,यांनी मला सांगीतले कि सुकनाथ बाबा मंदिरा जवळ लोकांनी टॅक्ट्रर पकडलेले असुन त्यामध्ये रेती भरलेली आहे. तुम्ही तेथे जा असे सांगीतल्याने मी लागलीच सुकनाथ बाबा मंदीरा जवळ जावुन पाहीले तर तेथे विना नंबरचे निळ्या रंगाचे धुड वनिळ्या रंगाची ट्रॉलीसह ट्रॅक्टर रोडवर उभे होते.[ads id="ads2"]

  तेथे टँक्ट्रर जवळ लोकांची गर्दी जमलेली होती व लोकांनी टँक्ट्रर पकडलेले होते.सदरचे टँक्ट्रर वरील चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव नाना रतीलाल कोळी रा.विदगांव असे सांगीतले व मी त्यास विचारले कि तु टॅक्ट्रर मध्ये भरलेली रेतीचा ( वाळुचा ) तुझ्या जवळ परवाना आहे काय..? तेव्हा त्याने मला सदर वाळु बाबतचा परवाना नाही असे सांगीतले तेव्हा मी त्यास विचारले कि हे टँक्ट्रर कोणाचे मालकीचे आहे. तेव्हा त्याने मला टँक्ट्रर मालकाचे नाव बापु सुरेश कोळी रा.विदगांव असे सांगीतले तेव्हा लोकांची गर्दी कमी झाली होती.सदर टॅक्ट्रर मध्ये अंदाजे 1 ब्रास वाळु भर लेली मला दिसली तेवढ्यात टँक्ट्रर मालक बापु सुरेश कोळी हा त्या ठिकाणी आला व मी त्यास सांगीतले कि तुम्ही टॅक्ट्रर तहसील ऑफिस यावल येथे घेवुन चला असे त्यांना बोललो असता टॅक्ट्रर मालक बापु सुरेश कोळी व चालक नाना रतीलाल कोळी यांनी संगनमत करुन चालक याने टँक्ट्रर चालु करुन टॅक्ट्रर जोरात चालवुन तेथुन पळवुन घेवुन गेले म्हणुन मी लागलीच साकळी मंडळ अधिकारी सचिन जगताप, मनवेल येथील तलाठी विजय शंकर वानखेडे, डोंगर कोठारा येथील तलाठी वसिम तडवी, यावल तलाठी ईश्वर कोळी,अशांना फोन करुन बोलावुन घेतले परंतु सदर टँक्ट्रर पळून गेल्याने आम्ही टँक्ट्ररचा शोध घेतला परंतु टॅक्ट्रर मिळुन आले नाही.सदर टॅक्ट्रर मध्ये भरलेली वाळुचे वर्णन खालील प्रमाणे.

1) 4,000/- रुपये किंमतीची 1 ब्रास रेती (वाळु) कि.अं. जा.तरी दि. 24/12/2023 रोजी 11.25 वा.च्या पुर्वी चुंचाळे गावातील सुकनाथ बाबा मंदीरा जवळ टॅक्ट्रर व ट्रॉली वरील चालक नाना रतीलाल कोळी तसेच टँक्ट्रर मालक बापु सुरेश कोळी दोघे रा विदगांव ता जळगांव यांनी संगनमताने विना नंबरच्या निळ्या रंगाच्या टँक्ट्रर व ट्रॉली मध्ये अवैध गौणखनिज रेती (वाळु) भरुन तीचा

चोरटी अवैध वाहतुक करतांना मिळुन आल्याने मी त्यांना सदरचे टँक्ट्रर व ट्रॉली वाळुने भरलेले हे यावल तहसील कार्यालयात कारवाई करणे कामी घेवुन जात असतांना टॅक्ट्रर मालक व चालक असे दोघे टँक्ट्रर व ट्रॉली घेऊन तेथुन पळुन गेले आहे म्हणुन माझी टॅक्ट्रर व ट्रॉली वरील चालक नाना रतीलाल कोळी तसेच टॅक्ट्रर मालक बापु सुरेश कोळी दोघे रा.विदगाव ता. जळगांव त्याचे विरुध्द फिर्याद दिल्याने यावल पोलीस स्टेशनला संशयित नाना रतिलाल कोळी बापू सुरेश कोळी यांच्या विरुद्ध भादवि 379 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966/ 48 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!