रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथे फुले, शाहू, आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व भारतीय बौध्द महासभेच्या संयुक्त विदयमानाने चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक पंडित काश्यप सुर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या १११ व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व. दिप. धुप पुजन करून अभिवादन करण्यात आले.[ads id="ads1"]
अभिवादन करताना भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, सचिव संघरत्न दामोदरे, कार्यालयीन सचिव सदाशिव निकम, जिल्हा सदस्य विजय अवसरमल, रावेर शहराध्यक्ष राहुल डी गाढे , वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, माजी पंचायत समिती सदस्य कैलास पारधी, संविधान आर्मीचे रावेर तालुका सचिव उखर्डू तडवी, अमोल हिवरे, नरेंद्र लोहार, संतोष धनगर, मनोहर तायडे, नितीन तायडे, राहुल राणे, जितेन्द्र साबळे यांनी आभार मानले वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.