https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6





 

मॉडर्न इंग्लिश स्कूल रावेरच्या विद्यार्थीनीची जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे दिनांक 11 - 12 -2023 रोजी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूल रावेर येथील 14 वर्ष वयोगटातील इयत्ता नववी ची विद्यार्थिनी कु. कोमल सुनील गाढे या विद्यार्थीनीने जिल्हास्तरीय या  तायक्वांडो स्पर्धेत भाग घेतला होता.[ads id="ads1"]

   या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळवून शाळेचा गौरव वाढविला. तसेच या विद्यार्थीनीला  शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. जयेश बिरपन सर व सौ. लक्ष्मी अस्वार मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

या विद्यार्थीनीची  विभागस्तरीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे. या विद्यार्थीनीला शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!