यावल ( सुरेश पाटील )
तालुक्यातील सावखेडासीम येथील नागेश्वर कौतिक साळवे यांची भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा पूर्व अनुसूचित जाती मोर्चा पदी अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सहीने पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.[ads id="ads1"]
भारतीय जनता पक्षाचे 1995 पासून नागेश्वर साळवे हे कट्टर समर्थक कार्यकर्ते होते आणि आहेत 95 ते 2000 सावखेडा सिम ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी तसेच 2003 ते 2008 कृषी उत्पन्न बाजार समिती यावलच्या संचालक पदी व 2005 पासून 2010 ग्रामपंचायत सदस्य 2008 ते 13 पर्यंत पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते. 2010 ते 15 पर्यंत पुन्हा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले 2012 ते 2017 पर्यंत पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी सदस्य पद भोगले.[ads id="ads2"]
2005 पासून अनुसूचित जाती मोर्चा यावल तालुका भाजपा अध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा संघटन सरचिटणीस म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम पहिले तर आता भारतीय जनता पक्षाने पुन्हा त्यांच्यावर जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली आहे.
नागेश्वर कौतिक साळवे यांच्या नियुक्तीमुळे ना.गिरीश महाजन,जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे,उपाध्यक्ष हिरालाल भाऊ चौधरी,शरद महाजन, रवींद्र पाटील यांच्यासह तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,उज्जैन सिंग राजपूत,विलास चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षलभाऊ पाटील, नरेंद्रभाऊ नारखेडे,डॉ.कुंदन फेगडे,लहू पाटील,सलिम तडवी सर,डॉ.नरेंद्र कोल्हे, सागर कोळी,व्यंकटेश बारी, राहुल बारी,किशोर कुलकर्णी यांच्यासह तालुक्यातील भाजपाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



