"संशयित आरोपी विरुद्ध कार्यवाहीसाठी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन"
------------------------------------------------------
"घडलेली घटना ही गंभीर असून, संशयित व्यक्तीस लवकर अटक झाली पाहिजे.नाही तर दोन दिवसांनंतर पुन्हा यासाठी आंदोलन पुकारले जावू शकते असे पालिका मुख्याधिकारी हर्षल सोनवणे यांनी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सांगितले."
---------------------------------------------------
सावदा ता.रावेर वार्ताहर (युसूफ शाह)
सावदा :- येथील नगरपालिकेत कार्यरत कार्यालयीन अधीक्षक तथा आरोग्य अधिकारी सचिन चोळके यांना एका तरुणाने हुज्जत घालून अश्लील शिवीगाळ देत मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आज शुक्रवार रोजी सकाळी काळ्याफिती लावून पालिकेतील सर्व विभागाचे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावदा नगरपरीषद कार्यालयात कार्यालयीन अधीक्षक तथा आरोग्य अधिकारी हे दि.१४ डिसेंबर २०२३ रोजी त्यांच्या कार्यालयात बसुन शासकिय कामकाज करीत होते.तेव्हा सायंकाळी ५ वाजेता त्यांच्या आरोग्य विभागाच्या कॅबीनमध्ये आकाश दिपक बोयत रा.मेहतर कलनी सावदा ता.रावेर हे येवुन म्हणाला कि,तुम्ही सावदा नगरपरीषदेचे सफाई कामाचे शौचालयाचे बिल मंजुर केले किंवा नाही.यावर सदर कामाचा ठेका हा त्रयस्थ संस्थेला दिलेला आहे.तुम्ही त्यांचेकडेस जावुन हे विचारू शकता असे आरोग्य अधिकारी त्यास बोललो असता याचा राग आल्याचे थेट आकाश बोयत याने त्यांचे टेबलाबवर ठेवलेले कार्यालयीन दस्तऐवज व ते लिहीत असतांना हातातून हिसकावून फाडून फेकून दिले तसेच अश्लील शिवीगाळ देत, तुम्ही सदरचा ठेका त्यास का दिला म्हणत जोर जोरात ओरडत येथे आरोग्य अधिकारी सचिन चोळके यांना त्यांनी चापटा, बुक्क्यांनी मारहाण करून तुला पाहून घेईल असा दम दिला.तेव्हा नगरपरीषद कार्यालयातील कर्मचारी मनोज वसंत चौधरी व धिर्ज कृष्णा बनसोडे व कामानिमीत्त नगरपरीषद आरोग्य विभागामध्ये हजर असलेले दोन व्यक्ती यांनी आकाश बोयत यांची समजूत घालुन त्याला पकडुन बाहेर पाठविले.सदर घटनेची माहिती कार्यालयातील मुख्याधिकारी यांना देऊन तसेच कार्यालयातील लोकांशी विचारविनीमय करून घडलेली घटनेची फिर्याद आरोग्य अधिकारी सचिन चोळके यांनी सावदा पोलीस स्टेशनला दिल्याने आकाश दिपक बोयत यांचे विरुद्ध गुरनं.२६२/२०२३ भादवी कलम ३५३,३२३,५०४,५०६ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.