जळगांव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :- भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा महिला कार्यकारणी निवडीबाबत नुकतीच जळगाव येथील वाघ नगरतील यशवंत भवन येथे प्रदेश अध्यक्षा स्वाती शिंदे, उपाध्यक्ष रागिणी पवार, संघटक लता तायडे व राज्य उपाध्यक्ष के. वाय. सुरवाडे याच्या प्रमुख उपस्थित व मार्गदर्शना खाली जळगाव जिल्ह्याची महिला जिल्हा कार्यकारणी ची निवड करण्यात आली.[ads id="ads1"]
त्यामध्ये जिल्हा अध्यक्ष प्रियंका अहिरे तर सरचिटणीस पदी वैशाली सरदार,याची निवड करण्यात आली तर उर्वरित कार्यकारणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष सुमित्रा सर्वटकर, करुणा नरवाडे,सुनीता वानखेडे, संघटक पदी वनमाला हिवाळे, हिशोब तपासणीस नंदा बोदडे, कार्यलयीन सचिव सुषमा इंगळे,सचिव(संस्कार) आशा पोहेकर,छाया सुरवाडे,सचिव(पर्यटन व प्रचार )कविता सुरवाडे,विद्या झनके, सचिव(संरक्षण)पल्लवी गुरुचळ, वनिता साळवे,[ads id="ads2"]
संघटक सिंधू निकम, ललिता बोदडे, भारती तायडे,रंजू होलार याप्रमाणे जिल्हा महिला कार्यकारणीची निवड करण्यात आली. या वेळी जिल्हा सरचिटणीस आनंद ढीवरे, कोषध्यक्ष शैलेंद्र जाधव, हिशोब तपासणीस ए. टी. सुरळकर, उपाध्यक्ष सुशीलकुमार हिवाळे, सचिव वसंत लोखंडे, संघटक बी. के. बोदडे,प्रकाश सरदार,कार्यलयीन सचिव सुभाष सपकाळे,लेफ्ट कर्नल युवराज नरवाडे, रमेश साळवे,अरुण तायडे,उत्तम सुरवाडे, शांताराम मोरे, प्रमोद सुरवाडे,इत्यादी उपस्थितीत होते.