सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
"रावेर तालुक्यातील रायपूर येथील ज्ञानगंगा विद्यालयातील शैक्षणिक साहित्य चोरी प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित चौघांना गजाआड केले आहे. ही चोरी उघड झाल्याने त्यात स्थानिक तरुण मुलांचा सहभाग असल्याने रायपूर गावातील स्थानिक रहिवाशीही चकीत झाले.या कामगिरीबाबत स्थानिक रहिवाशी तसेच शाळेचे संस्थाचालक, शिक्षक यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.सहा.पोलीस निरीक्षक सावदा पोलीस स्टेशन यांनी पालकांना आपल्या मुलांच्या संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्याबाबत सूचना केल्या आहे."[ads id="ads1"]
सविस्तर असे की,सावदा पोलीस स्टेशन अंतर्गत रायपूर,ता.रावेर येथील ज्ञानगंगा विद्यालयात गेल्या २८ ते २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शाळेचे ऑफीसचा कढीकोडां तोडून आत प्रवेश करुन शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अभ्यासक्रमाकरीता असणारे संगणक,प्रोजेक्टर, एलईडी टीव्ही,वजनकाटा व इतर साहित्य असे महागड्या ऐवजावर डल्ला मारला होता.त्या अनुषंगाने शाळेचे प्राचार्य यांनी सावदा पोलीस स्टेशन गाठुन घडलेला संपूर्ण प्रकार सहा.पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांच्यासमोर समोर कथन करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्याचा लवकरात लवकर तपास लावण्याची विनंती केली होती. [ads id="ads2"]
त्यावरन सावदा पोलीस स्टेशन येथे २९ नोव्हेंबर २०२३ रोजी गुरनं २४०/२०२३ प्रमाणे घरफोडीच्या कलमान्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला होता.याप्रकरणी स.पो.नि.पळे यांनी एसडीपीओ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस गस्त वाढवून त्यांची तपासचक्रे गतीमान करून पोलीस हवालदार विजय पोहेकर,संजीव चौधरी, सुनील कुरकुरे,बबन तडवी असे पथक तयार करून त्यांना चोरट्यांचा मागोवा घेऊन गुन्हा उघड करण्याचे आदेश देऊन मार्गदर्शन केले.पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित एका संशयित आरोपीतास ताब्यात घेतले.त्यास पोलीस खाक्या दाखविताच त्याने अपराधाची कबुली देऊन त्याच्या साथीदारांची नावे पोपटासारखी कबुल केली. पोलिसांना याप्रकरणी ४ आरोपीना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेले शालेय साहित्य जप्त केले आहे.
प्रकरणाचा तपास सुरु असून यापूर्वी झालेल्या चोऱ्या उघड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणातील चोरटे हे रायपूर गावातील स्थानिक रहिवासो असून विशेष म्हणजे ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेत चोरी करणारे निघाले. याप्रकरणात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आल्याचे या प्रकरणावरुन दिसुन येते.प्रत्येक पालकांनी आपल्या लहान मुलांकडे जातीने लक्ष दिले पाहिजे.


