रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी
रावेर तालुक्यातील फैजपूर येथे नवीन प्रांताधिकारी म्हणून ,सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून सौ( देवयानी यादव) यांनी नुकताच पदभार सांभाळला आहे. [ads id="ads1"]
सोमवार रोजी त्यांनी मावळते प्रांताधिकारी (कैलास कलगडे )यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी 2020 बेचेचे आयएएस अधिकारी असलेल्या देवयानी यादव, यांची पहिली नियुक्ती झाली असून, प्रथमच जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी मिळाले आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर मावळते प्रांताधिकारी कैलास कलगड, यावल तहसीलदार मोहनमाला नाजीरकर, रावेर तहसीलदार बीए कापसे, मयूर कळशे पाटील, उप अधीक्षक डॉ कुणाल सोनवणे, यांनी नवीन प्रांताधिकारी देवयानी यादव यांचे स्वागत केले.