यावल (सुरेश पाटील) जिल्हा परिषद जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून यावल तालुक्यातील एका ग्रामसेवकाला निलंबित करण्याचा आदेश यावल पंचायत समिती कार्यालयात प्राप्त झाला आहे.परंतु यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी या प्रकरणातील फिर्यादीला अंधारात ठेवून कारवाई दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यावल तालुक्यासह जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात बोलले जात आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील एका ग्रामपंचायत मधील सरपंच यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा दुरुपयोग करून संबंधित ग्रामसेवकाने सरपंच व त्या ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता पंधरावा वित्त आयोगातील अंदाजे ७ ते ८ लाख रुपयांचा निधी आपल्या सोयीनुसार खर्च करून गैरप्रकार भ्रष्टाचार करून दप्तरी दाखल असलेल्या बिलाप्रमाणे नेमक्या त्याच वस्तू ग्रामपंचायत कार्यालयात आहे किंवा नाही..? [ads id="ads2"]
आणि इतर कारभाराची सुद्धा चौकशी करण्याची तक्रार एका महिला माजी सदस्यांने केली होती आणि आहे त्या तक्रारीची दखल घेऊन चौकशी व कारवाई पूर्ण करून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गेल्या ८ दिवसापूर्वी ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे आदेश यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिले आहेत परंतु यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी अद्याप पावतो त्या ग्रामसेवकाला निलंबित का केले नाही..? तसेच निलंबन आदेशाची प्रत फिर्यादीला का दिली नाही..? तसेच गंभीर प्रकरणाची माहिती प्रसिद्धी माध्यमांपासून लपवून ठेवल्याने आणि कारवाई होत नसल्याने जळगाव जिल्हा परिषद व यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रासह राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.