सावदा पोलिसांनी पकडली कत्तलीसाठी १३ उंट कोंबून घेऊन जाणारी आयशर ट्रक!

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


आरोपी ३ मात्र दोन अटक एका फरार

-----------------------------------------------------

"कत्तलीसाठी निर्दयीपणे कोंबून अवैधरित्या १३ उंट घेऊन जाणारी आयशर ट्रक सावदा पोलिसांनी पकडली.तरी शेकडो कि.मी.चा प्रवास करून थेट मध्य प्रदेश व महाराष्ट्र असे दोन आरटीओ बॉर्डर वरून प्राणी उंट वाहतुकीचा कोणतच परवाना नसलेली ही ट्रक इथपर्यंत येणे संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी नाही का?तरी जिल्हा आरटीओ अधीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी याकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे."[ads id="ads1"]

-----------------------------------------------------   

सावदा ता.रावेर वार्ताहर (युसूफ शाह) 

सावदा :- सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लुमखेडा,शिवार हतनूर धरणाचे पुलाजवळ भारतीय वंशाचे दोन लाख ८५ हजार रुपये किमतीचे एकूण १३ उंट अतिशय निर्दयीपणे दाटीवाटीने कोंबून त्यांचे पाय व तोंड दोरीने बांधून उंट वाहतुकीचा कुठलाही परवाना नसताना बेकायदेशीर रित्या कत्तलीसाठी घेऊन जाणारी दहा लाख रुपये किमतीची आयशर ट्रक क्रं.सीजी १२ बीएच ३२८१ यास दि.६ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारात सावदा पोलिसांनी पकडल्याची घटना घडली आहे.[ads id="ads2"]

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विनोद भिमराव दामोदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (१) मकबूल खान फकृद्दीन खान वय ४५,रा.वरखेडा तह.आष्टा जि. सिहोर,(२)अरबाज खान शकील खान वय २१ राहणार अमरपुरा तहसील जिल्हा देवास,मध्य प्रदेश या दोघे आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली असून(३)खालिद खान खलील खान राहणार नोशेराबाद देवास मध्य प्रदेश हे आरोपी फरार झालेला आहे.या तिघे आरोपींविरुद्ध गुरनं.२५६/२०२४ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११(१)(घ),(ड),(च),(ज) आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९६० चे कलम ६,९,११, व मोटर वाहन कायदा १९८९ चे कलम ८३ प्रमाणे सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास एपीआय जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अन्वर तडीवी व पोलीस नाईक मोहसीन पठाण हे करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!