विकास कामे रस्ते नसल्याने रावेर सावदा शहराची घरपट्टी माफ करा - प्रशांत बोरकर यांची रावेर तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रशांत बोरकर व शिष्टमंडळ यांनी रावेरचे तहसीलदार श्री बंडू कापसे यांना निवेदन देऊन रावेर शहरातील तसेच परिसरातील समस्या संदर्भात निवेदन सादर केले यावेळी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे व अन्य अधिकारी सुद्धा उपस्थित होते सायंकाळी सुट्टीच्या दिवशी सुद्धा नागरिकांची चर्चा केली व निवेदन स्वीकारले.[ads id="ads1"]

रावेर शहरातील रस्त्यांची खराब अवस्था झाली असून लोकांचे  कंबरडे मोडले असून लोक आजाराने बेजार झालेले आहेत त्यात कुत्र्यांच्या चावामुळे सुद्धा लोक हैराण झालेले आहेत कोणत्याही प्रकारचे नगरपालिकेचे नियंत्रण विकास कामे होत नसून उलट भरमसाठ घरपट्टी झाल्याने जनता होरपळून गेली आहे त्यामुळे रावेर सावधा नगरपालिकेची घरपट्टी तातडीने रद्द करण्यात यावी आणि रावेर नगरपालिकेच्या बेबंधकार झाला पाय बंद व्हावा.[ads id="ads2"]

   तसेच रावेर रसल्पुर ABHODA जिंसी रस्ता रावेर  SAVDA RAVER  BURHANPUR दुरुस्त व्हावा अनेक रस्ते मंजूर झाले असूनही त्यांचे काम होत नसून कागदोपत्री करण्यात येते व लाखो करोडचा खर्च करण्यात येतो त्याची सुद्धा चौकशी करावी व दर्जेदार कामे होण्यात यावी अशी मागणी तहसीलदार रावेर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदन देताना भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रशांत बोरकर जिल्हाध्यक्ष संजय चौधरी दीपक भालेराव अजगर अली दामोदरे डीडी वाणी वसंत महाजन शशांक बोरकर महेश तायडे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!