यावल ( सुरेश पाटील ) यावल येथे सरस्वती विद्या मंदिरात जागतिक दिव्यांग दिन प्रहार दिव्यांग संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.[ads id="ads1"]
संस्थापक अध्यक्ष वंदनीय बच्चूभाऊ कडू प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेचे राज्य अध्यक्ष बापूराव काणे साहेब डॉ. रामदास खोत साहेब महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा राज्य प्रमुख महासचिव तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या प्रेरणेने तसेच प्रहार दिव्यांग संस्था संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानव्ये व प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा उपाध्यक्ष दिनेशभाऊ सैमिरे व जिल्हा सल्लागर शरद बारजिभे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार दिव्यांग संस्था संघटना यावल तालुका येथे 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन सरस्वती विद्या मंदिर यावल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील तसेच जिल्हा सल्लागार शरद बारजिभे तसेच प्रहार शेतकरी आघाडी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुरेश चिंधु पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत वारूळकर यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलित केले व कै.मोहनदादा सोनार यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.[ads id="ads2"]
सुरुवातीला प्रहार दिव्यांग संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष प्रविण सोनवणे यांनी केलेल्या कार्याचा आढावा दिला.त्यानंतर प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी दिव्यांग बांधवांना मिळत असलेल्या विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा दिव्यांगांना होणारा लाभ या संदर्भात मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी प्रत्येक दिव्यांगाच्या चेहऱ्यावर उत्साहीतपणा निदर्शनास आला,मार्गदर्शन केल्यानंतर बाळासाहेब पाटील यांनी दिव्यांगांच्या विविध समस्यांचे निवारण केले तसेच यावल तालुक्याची प्रहार दिव्यांग संघटनेची महिला आघाडीची कार्यकारिणी जाहीर केली प्रहार दिव्यांग संघटनेच्या अध्यक्षपदी खुशबू दिगंबर चौधरी रा.आमोदे यांची निवड झाली तसेच उपाध्यक्षपदी सरला तायडे रा.किनगव यांची नियुक्ती करण्यात आली शहर अध्यक्षपदी मंगला बारी रा. यावल यांची नियुक्ती झाली तालुका सल्लागारपदी गीतांजली शशिकांत वारूळकर रा.यावल यांचे नियुक्ती झाली त्यानंतर आलेल्या दिव्यांग बांधवांसाठी अल्पोहार व चहा देण्यात आला व गरजू दिव्यांग बंधू आणि बघिणीनीना ब्लॅकेटचे वितरण करण्यात आले, कार्यक्रमासाठी सरस्वती विद्या मंदिर संस्था प्रमुख रमणभाऊ देशपांडे व अध्यक्ष अरुणभाऊ कुलकर्णी तसेच मुख्याध्यापक मुख्यध्यपक जी.डी.कुळकर्णी सर यांनी दिव्यांगांसाठी शाळा उपलब्ध करून दिली व व किरणभाऊ ओतारी तसेच त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी जनार्दन फेगडे, मिथुन सावखेडकर,विश्वनाथ बारी,दिलीप आमोदकर,प्रदीप माळी,उत्तम कानडे,दिलीप चौधरी,सुभाष पाटील,भगवान फेंगडे.एडवोकेट गोविंदा बारी, तसेच रुग्णसेवक नदीमखान, उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी यावल तालुक्यातील विविध व्यापारी वर्गाने कार्यक्रमास मदत केली तसेच प्रत्येक दिव्यांग बंधू भगिनीनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कार्यक्रम संपन्न करण्यासाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे तालुका अध्यक्ष प्रविण सोनवणे व प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी यांनी आभार मानले.