रावेर (विनोद हरी कोळी) : ऐनपूर येथील ऐनपूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्ष विज्ञान वर्गातील विद्यार्थीनी कु.प्रियंका कैलास तायडे हीची ४९ किलो वजन उचलणे (वेट लिप्टींग) या गटात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात निवड झाली. सदर आंतर विद्यापीठ स्पर्धा दिनांक ०९ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२३ या कालावधीत आदीकवी नन्या विद्यापीठ राजा नरेंद्र नगर , राजामहेंद्रवर्मन आंध्रप्रदेश येथे होणार आहे.[ads id="ads1"]
या स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघ ०६ डिसेंबर २०२३ रोजी जळगाव येथून रवाना होणार आहे.कु.प्रियंका कैलास तायडे हिने आंतर महाविद्यालयीन व आंतर विभागीय स्पर्धेत ४९ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करून विद्यापिठाच्या संघात स्थान मिळविले. कु.तायडे हिला महाविद्यालयाचे क्रिडा संचालक डॉ.सचिन नामदेव झोपे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.[ads id="ads2"]
विद्यापिठ संघात निवड झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन श्री.श्रीराम नारायण पाटील.अध्यक्ष श्री.भागवत विश्वनाथ पाटील,सचिव श्री.संजय पाटील, संस्थेचे उपाध्याक्ष श्री.आर.एन.महाजन तसेच स्थानिक क्रिडा समितीचे सदस्य प्रो.डॉ.आर.व्ही.भोळे, प्रा.डॉ.डी.बी.पाटील, प्रा.एस.बी महाजन, प्रा.डॉ.पी.आर.गवळी, प्रा.एस.आर.इंगळे, प्रा.डॉ.रेखा पाटील, प्रा.अक्षय महाजन, प्रा.मिलींद भोपे, प्रा.प्रदिप तायडे आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढिल होणार्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.