मैत्री जीवाभावा ची ग्रुप पाणपोई निंबोल येथील सुधाकर सोनार यांचे विशेष योगदान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी

रावेर तालुक्यातील जुने निंबोल येथे अनेक वर्षापासून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी अजून पर्यंत पाणपोईची सुविधा उपलब्ध नव्हती तसेच एप्रिल व मे महिन्याच्या लखलखत्या उन्हाळ्यात रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याचे कुठे सोय नव्हती ही बाब जुने निंबोल येथील काही तरुणांच्या लक्षात आली तेव्हा गावातील तरुण युवक पिढी यांनी उभारलेला मैत्री जीवाभावाची ग्रुप निंबोल यांच्यामार्फत भरून नात तहानलेल्या नागरिकांचा आत्मा शांत करण्यासाठी जुन्या निंबोले येथे या ग्रुप मार्फत पाणपोई उभारण्यात आली. [ads id="ads1"]

           आज रोजी जुने निंबोल येथे पाणपोई उभारून जवळपास एक वर्षे पूर्ण झालेले आहेत सुरुवातीला नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा माठ भरण्यासाठी थोडे दिवस दोन ते तीन महिने आपले योगदान दिले. त्यानंतर पिण्याचे पाण्याचे माठ भरण्याकडे काही तरुण दुर्लक्ष करायला लागले त्यावेळेस ,जुने निंबोलयेथील सुधाकर सोनार दररोज पिण्याच्या पाण्याचेvh रांजण भरू लागले .अशाप्रकारे त्यांचे ही सेवा अविरत आजपर्यंत चालू आहे.[ads id="ads2"]

  तहानलेल्या लोकांची तहान भागविणे हेच आपले कर्तव्य आहे .असे लक्षात घेऊन सुधाकर सोनार समाजकार्य करून आपले योगदान देत आहेत .समस्त जुने निंबोल नवीन निंबोल गावातून त्यांचे कौतुक केले जात आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!