रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी
आज दिनांक 5 /12 /2013 रोजी गुरांनी भरलेल्या दोन मालवाहतूक गाड्या निंभोरा सिम गावाजवळ बजरंग दलामार्फत पकडण्यात आल्या. सविस्तर वृत्त असे की रसलपुर तालुका रावेर येथून गुरांनी भरलेल्या दोन मालवाहतूक गाड्या विटवा मार्गे मुक्ताईनगरच्या दिशेने जात होत्या. याची गुप्त खबर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली लगेच कार्यकर्ते यांनी निंभोरा सिम जवळ गुरांनी भरलेल्या दोन गाड्या थांबवून त्यांना पकडले दोन्ही गाड्यांपैकी एक गाडी छोटा हाती (MH. ०२CE ४१६० ) या क्रमांकाची होती. [ads id="ads1"]
तर दुसरी गाडी बोलेरो पिकप असून तिला नंबर प्लेट नव्हती तसेच दोन्ही गाड्यांमध्ये कसेबसे दाटी करून तीन तीन बैल म्हणजे सहा बैल भरलेली होती. अशा परिस्थितीत त्या बैलांना हालता सुद्धा येत नव्हतं तसेच सर्व बैल वयस्कर असून त्यांना कत्तलखान्याकडे नेत असल्याचे नागरिकांकडून समजले जात आहेत. [ads id="ads2"]
त्या ठिकाणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून निंभोरा पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यांना फोनवरून बोलवण्यात आले. तसेच पोलीस कर्मचारी स्वप्निल पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी लगेच दाखल झाले. तसेच गुरांनी भरलेल्या दोघं मालवाहतूक गाड्या निंभोरा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आल्या.
आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गाडी क्रमांक (MH०२CE४१६०) या क्रमांकाचा गाडी मालक दीपक चौक से हा रसलपुर येथील असल्याचा समजते. तसेच विश्व हिंदू परिषद रावेर तालुका अध्यक्ष अक्षय पाटील, आणि बजरंग दलाचे आर पी प्रमुख राज पाटील यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहेत. तसेच पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशनचे एपीआय हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.



