सावदा ता.रावेर वार्ताहर (युसूफ शाह)
सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित ॲंग्लो उर्दू हायस्कूल मध्ये संचालक तथा शाळा समिती चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान वय.४८ यांनी १३ वर्षीय शाळकरी बालिकेचा शाळेत वाईट हेतूने अतिशय घृणास्पद व कीळसवानी पद्धतीने विनयभंग केल्याप्रकरणी तो १४ ऑगस्ट २०२३ पासून जिल्हा कारागृहात बंदिवान असताना यादरम्यान त्यांनी भुसावळ सत्र न्यायालयात दोनदा जामीन मिळावा म्हणून अर्ज सादर केले होते.परंतु त्याचे जामीन कोर्टाने नाकारल्यामुळे अखेर त्यानी जामीन मिळावा म्हणून औरंगाबाद उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.सदर जामीन अर्जावर दि.११/१२/२०२३ रोजी उच्च न्यायालयात शेवटची सुनावणी झाली.आरोपीचे वकील,फिर्यादीचे वकील यांनी आपापल्या पद्धतीने युक्तिवाद केला.परिणामी त्याच दिवशी पोसको अंतर्गत दाखल गुन्ह्याचा"निकाल लागेपर्यंत अक्रम खान अमानुल्ला या संशयित आरोपीने सावदा गावात जाऊ नये"या अटीवर औरंगाबाद उच्च न्यायालयाने अखेर त्याचा जामीन मंजूर केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.