नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) : नांदगाव तालुक्यातील मंगळणे ग्रामपंचायतीच्या आदिवासी महिला सरपंच वैशाली पवार यांचे तीन महिन्यांच्या बाळाला घेऊन ग्रामसेविका हिमगौरी आहेर यांना बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी नांदगाव पंचायत समिती समोर सुरू असुन चौदावा दिवस आहे.याच उपोषणाचा वचपा काढत मंगळाणे येथील वादग्रस्त अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढले परंतु ग्रामसेविका यांना बडतर्फ गटविकास अधिकारी दळवी यांनी केले नाही. त्यामुळे आदिवासी महिला सरपंच व त्यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी सोमवारी जुनें तहसील कार्यालय नांदगाव समोर रस्ता रोको करण्यात येणार आहे.[ads id="ads1"]
मंगळणे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या वरील सरकारी गायरान अतिशय हरिदास पोपट पाटील यांनी 6 हेक्टर 25 आर क्षेत्रात अतिक्रमण केले असल्याचे तक्रार सन 2019 मध्ये संजय पाटील यांनी जिल्ह्याधिकारी यांच्याकडे केली होती.हरिदास पाटील यांनी सरकारी गायरान जमीन गट क्रमांक 134 क्षेत्रात अतिक्रमण करून पक्के घर बांधले होते.तसेच अन्य जमिनीवर बागायती शेती करुन स्वतः घ्या नावे पिक पाहणी लावल्याचे सिध्द झाले झाल्याने अतिक्रमण काढण्याबाबतची सुचना तत्कालीन तहसीलदार मनोज देशमुख यांनी सन 2019 मध्ये दिली होती.तसेच या क्षेत्रावर लावण्यात आलेली पिक पाहणी देखील रद्द करुन महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग परिपत्रक 2013 नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले होते.[ads id="ads2"]
अखेर चार वर्षा नंतर पोलीस बंदोबस्तात वादग्रस्त अतिक्रमण काढण्यात आले.यावेळी नांदगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विजयकुमार ढवळे, वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) दिनेश पगार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे, ग्रामसेविकेवर हिमगौरी आहेर,वेहेळगाव महसूल मंडळ अधिकारी जी.यु.काळे,तलाठी एस येवले आदीं उपस्थित होते.
या क्षेत्रात बांधकाम करण्यात आलेली आरसीसी इमारत तसेच काही क्षेत्रात लागवड करण्यात आलेले कांदा,मका,व ऊस पिक क्षेत्रात देखील यावेळी जेसीबी फिरवण्यात आला. अतिक्रमण काढण्यात आलेल्या जागेवर यापुढे कुणीही अतिक्रमणा करु नये म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतिबंधक कारवाई बाबतचा फलक लावण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या कारवाईमुळे अतिक्रमण धारकाचे धाबे दणाणले आहे.
मात्र ही कारवाई मंगळणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ वैशाली पवार यांच्या उपोषणाला ग्रामपंचायत सदस्य हरिदास पाटील यांचे सहकार्य असल्यामुळें व ग्रामसेविका हिमगौरी आहेर यांना बडतर्फ करण्यात यावा मागणीसाठी तटस्थ असल्याने ही कारवाई केली असल्याचे सिद्ध होत आहे.कारण हे अतिक्रमण काढण्याचे परिपत्रक 2013 मध्ये काढण्यात आले होते.तसेच अतिक्रमण बाबतची केस कोर्टात चालु आहे याचा निकाल अद्याप पर्यंत लागलेला नाही.तरी देखील अतिक्रमण काढण्यात आले.
मंगळणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ वैशाली रामभाऊ पवार यांचे उपोषण आजुन सुरुच असुन ग्रामसेविकेने 14 वर्षाच्या मुलाकडुन काम करुन घेतले व त्या बालकामगारांच्या नावे रक्कम (पैसे) काढले आहे तरी देखील गटविकास अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांनी ग्रामसेविकेवर कारवाई करुन बडतर्फ केले नाही म्हणून व महिला आदिवासी सरपंच सौ वैशाली पवार यांच्यावर अन्याय होत असल्याने वंचित बहुजन आघाडी च्या वतीने दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी सोमवारी नांदगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी बोलताना दिली आहे.



