विश्वशांति करीता तिबेटी जनतेने केली हाफसुल पूजा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


    जळगाव :- जळगाव येथील तिबेटी जनते तर्फे दरवर्षी १० डिसेंबर रोजी जागतिक मानवी हक्क दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . या वर्षी सुद्धा त्यांनी शिवतीर्थ मैदानावर हा दिवस साजरा केला.

        सुरवातीस त्यांनी बुद्धपूजा , धूपपूजा केली त्यानंतर हाफसुल पूजा केली या प्रसंगी त्यांनी तारादेवी ची विशेष पूजा करुन विश्वशांति नांदो , माणसा माणसात प्रेम व बंधुभाव वृद्धिंगत होवो अशी प्रार्थना केली . पूजाविधि ग्रंथ पठन कुसंग संगमो या महिलेने केले , नीमा सैतेन यांनी २३ तिबेटी मंत्र म्हटली व दलाई लामा यांच्या दीर्घायुष्या करीता विशेष प्रार्थना केली.[ads id="ads1"]

      सामुहिक बुद्धवंदना घेतल्या नंतर मुख्यवक्ता जयसिंग वाघ यांनी दलाई लामा यांच्या तिबेट मुक्ति आंदोलना विषयी तसेच जागतिक पातळीवर मानविप्रेम वृद्धिंगत व्हावे , शांतता नांदावी या करीता करीत असलेल्या कार्याची माहिती दिली . तसेच वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की भारतातून बौद्ध धर्म हद्दपार झाल्या नंतर अनेक मुळ बौद्ध साहित्य नष्ट झाली मात्र ज्या देशांनि मुळ बौद्ध साहित्य जतन करुन ठेवली त्यात तिबेट एक देश आहे , आज जगभरात दलाई लामा बौद्ध धर्माचे मुख्य धर्मगुरु म्हणून ओळखले जात आहेत , त्यांना अनेक जागतिक दर्जाचे पुरस्कार मिळत आहेत , त्यांच्यामुळे अनेक लोक बौद्ध धर्माकड आकर्षित होत आहेत.[ads id="ads2"]

      प्रा. सरोजिनी लाभाने यांनी बुद्ध , धम्म , संघ यांचे महत्व सांगून दलाई लामा यांचे कार्य पुढं न्यावे असे आवाहन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनम टाशि यांनी , स्वागत छेवांग फलनु यांनी तर आभार प्रदर्शन फावुरा चेरिंग यांनी केले .

      कार्यक्रमाच्या यशस्विते करीता नीमा सीमेन , भंगरु , लोंदेन , सुशीलाबाई सालुंके यांनी प्रयत्न केले . राहुल सालुंके , सचिन पवार यांनी मानवाधिकार विषयक पत्रक वाटून या दिनाचे महत्व सांगितले , कार्यक्रमास गौतम साबळे , निशा साबळे आदिंसह तिबेटी स्त्री पुरुष मोठ्या संखेने हजर होती . कार्यक्रमाच्या शेवटी तिबेटी मंत्राचा जयघोष केला व विविध प्रकारची गाणी म्हटली .

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!